जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : सिलेंडर वूमनचा पाकिस्तानला तडाखा, धोनीसारखी आहे Untold Story

IND vs PAK : सिलेंडर वूमनचा पाकिस्तानला तडाखा, धोनीसारखी आहे Untold Story

IND vs PAK : सिलेंडर वूमनचा पाकिस्तानला तडाखा, धोनीसारखी आहे Untold Story

भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेत मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या सिलेंडर वूमननं पाकिस्तानला तडाखा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 मार्च : भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेत मॅच सुरू आहे. दोन्ही टीमची या स्पर्धेतील ही पहिलीच मॅच आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया अडचणीत आली होती.  मिडल ऑर्डर झटपट कोसळल्यानं टीमची अवस्था 1 आऊट 96 वरून 6 आऊट 114 अशी झाली होती. त्यानंतर टीम इंडियाची सिलेंडर वूमन म्हणून ओळखली जाणारी पूजा वस्त्राकारनं (Pooja Vastrakar) पाकिस्तानला तडाखा दिला. पूजानं स्नेह राणासोबत (Sneh Rana) सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दरम्यान पूजानं तिचं अर्धशतकही झळकावलं. पूजा-स्नेह यांच्या भागिदारीमुळे टीम इंडियानं 200 रनचा टप्पा ओलांडला आहे. बॉलिंग ऑल राऊंडर पूजाकडून या स्पर्धेत भारतीय फॅन्सना मोठ्या अपेक्षा आहेत. पूजानं पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ करत फॅन्सना दिलासा दिला आहे. टीम इंडियाची सिलेंडर वूमन मध्य प्रदेशातील शहाडोलची असलेल्या पूजानं आजवरच्या प्रवासात मोठा संघर्ष केला आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसारखी (MS Dhoni) पूजा देखील लहाणपणी फुटबॉलपटू होती. फुटबॉलनंतर ती क्रिकेटकडे वळाली. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय टीममध्ये पूजानं जागा निश्चित केली आहे. ही जागा निश्चित करण्यासाठी लॉक डाऊनच्या काळात सर्व जग बंद असतानाही पूजा घराच्या गच्चीवर सराव करत होती. IND vs PAK : कॅप्टन मिताली राजनं केली सचिनची बरोबरी, ‘हा’ रेकॉर्ड करणारी पहिली महिला पूजानं घराच्या गच्चीवर क्रिकेटचं पिच बनवलं होतं. फिटनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी सिलेंडर उचलून ती सराव करत असे. त्यामुळे टीम इंडियातील सिलेंडर वूमन म्हणून तिला ओळखले जाते.  राजस्थान रॉयल्सचे फास्ट बॉलिंग एक्स्पर्ट स्टीफन जोन्सकडून पूजानं ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. जोन्स यांच्या सल्ल्यानुसार तिने लॉक डाऊनमध्ये वेळापत्रक आखले होते.

जाहिरात

लॉक डाऊनच्या काळात केलेल्या कष्टाचं फळ पूजाला मिळालं. पूजानं पाकिस्तान विरूद्ध 59 बॉलमध्ये 67 रन केले. या खेळीत तिने 8 फोर लगावले. तसंच तिचा स्ट्राईक रेट 113.5 होता. टीम इंडियाकडून पूजासह स्नेह राणानंही अर्धशतक केले. स्नेहनं नाबाद 53 रन केले. त्यामुळे टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 244 रन केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात