मुंबई, 19 मार्च : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India Women vs Australia Women) यांच्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women’s World Cup 2022) मॅच सध्या सुरू आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली आहे. या स्पर्धेत फॉर्मात असलेली भारतीय बॅटर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) झटपट परतली. स्मृतीला 10 रनवर डर्सी ब्राऊननं आऊट केले. या वर्ल्ड कपमध्ये स्मृती चांगलीच फॉर्मात आहे. तिने पाकिस्तान विरूद्ध अर्धशतक तर वेस्ट इंडिज विरूद्ध शतक झळकावले होते. तर इंग्लंड विरूद्धही तिने टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले होते. स्मृतीला ऑस्ट्रेलिया विरूद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. स्मृती आऊट झाल्यानंतर भारतीय टीमला दुसरा धक्काही लवकर बसला. टीम इंडियाची दुसरी ओपनर शफाली वर्मा (Shafali Verma) 12 रन काढून आऊट झाली. खराब फॉर्ममुळे शफालीला वर्ल्ड कप स्पर्धेतील काही मॅच बाहेर बसावं लागलं होतं. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या लढतीमध्ये दीप्ती शर्माच्या जागी तिचा समावेश करण्यात आला. या संधीचा फायदा घेण्यात शफालीला अपयश आले.
#TeamIndia are 39/2 after 10 overs, having lost both their openers to Darcie Brown.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 19, 2022
Can captain Mithali Raj and Yastika Bhatia steady the ship?#CWC22 pic.twitter.com/AmLTOJLtP0
टीम इंडियाची या स्पर्धेतील ही पाचवी मॅच आहे. भारतीय टीमनं यापूर्वी झालेल्या चार मॅचपैकी 2 मॅच जिंकल्या असून 2 मध्ये पराभव स्वीकारला आहे. टीम इंडिया सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसरिकडं ऑस्ट्रेलियानं आजवर 4 पैकी 4 मॅच जिंकल्या असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर आहे. महेंद्रसिंह धोनी आणि 7 नंबर जर्सीचं काय आहे कनेक्शन? अखेर रहस्य उघड भारताची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीची (Jhulan Goswami) ही 200 वी वन-डे मॅच आहे. झूलनन इंग्लंड विरूद्धच्या मॅचमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये 250 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.