मुंबई, 18 मार्च : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतरही त्याच्या फॅन्सची संख्या कायम आहे. धोनी आता फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. आयपीएल स्पर्धेत त्याच्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचं लक्ष असतं. 7 नंबरची जर्सी घालून धोनी मैदानात उतरतो तेव्हा फॅन्सचा जल्लोष शिगेला पोहचलेला असतो. महेंद्रसिंह धोनी आणि 7 नंबरची जर्सी यांचं घट्ट नात आहे. धोनीनं 7 नंबरच्या जर्सीला नवी ओळख दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणापासून तो ही जर्सी घालत आहे. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेत तो याच जर्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमकडून खेळतो. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेल्या धोनीनं आयपीएल सिझनच्यापूर्वी 7 नंबरच्या जर्सीचं रहस्य सांगितलं आहे. धोनीसाठी सात नंबर लकी आहे, असं मानलं जात. पण, हे खरं नाही. धोनीनं एका कार्यक्रमात याचा खुलासा केला आहे. ‘मी हा नंबर सहजच निवडला होता,’ असं धोनीनं सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सच्या कार्यक्रमात धोनी म्हणाला की, ‘अनेकांना वाटत होते की 7 हा माझा लकी नंबर आहे. पण मी कोणत्याही खास कारणामुळे या जर्सीची निवड केली नाही. माझा जन्म 7 जुलै रोजी झाला. तो सातव्या महिन्याचा सातवा दिवस आहे. मी ही जर्सी निवडण्याचं हे एकमेव कारण आहे. मोहम्मद रिझवाननं 2.30 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराकडं पाहिलंच नाही! VIDEO मला त्यानंतरही लोकं प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर देण्यासाठी मी आणखी काही कारण सांगतो. काही जणं मलाही त्याची वेगळी कारणं सांगतात,’ असे धोनीनं यावेळी सांगितलं. धोनीच्या चेन्नईची पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (KKR) 26 मार्च रोजी होणार आहे. सीएसके यंदा पाचव्यांदा आयपीएल जिंकण्याच्या निर्धारानं स्पर्धेत उतरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







