Home /News /sport /

Women's World Cup, IND vs AUS : 'वर्ल्ड कप क्वीन'ची दमदार खेळी, टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक टार्गेट

Women's World Cup, IND vs AUS : 'वर्ल्ड कप क्वीन'ची दमदार खेळी, टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक टार्गेट

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup 2022) ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये पहिल्या दोन विकेट्स झटपट गेल्यानंतरही भारतीय टीमनं या मॅचमध्ये आव्हानात्मक स्कोअर उभा केला आहे.

    मुंबई, 19 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup 2022) ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 278 रनचं आव्हान दिलं आहे. पहिल्या दोन विकेट्स झटपट गेल्यानंतरही भारतीय टीमनं या मॅचमध्ये आव्हानात्मक स्कोअर उभा केला आहे. टीम इंडियाची वर्ल्ड कप क्वीन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) झळकावलेल्या दमदार अर्धशतकामुळे भारतीय टीमला 277 रन करता आले. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा झटपट आऊट झाल्या. 2 आऊट 28 या स्कोअरवरून यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) आणि कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) यांनी भारताची इनिंग सावरली. या वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरत असलेल्या मितालीला अखेर सूर गवसला. तिने यास्तिकासोबत तिसऱ्या विकेट्ससाठी 130 रनची भागिदारी केली. यास्तिका आणि मिताली या दोघींनीही अर्धशतक झळकावले. यास्तिकानं 59 रन काढले. तर मितालीनं 96 बॉलमध्ये सर्वाधिक 68 रनची खेळी केली. या खेळीत मितालीनं 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. मितालीचं या वर्ल्ड कपमधील पहिलं तर वन-डे कारकिर्दीमधील  63 वे अर्धशतक आहे. टीम इंडियाची 2 आऊट 158 वरून 6 आऊट 213 अशी घसरण झाली. त्यानंतर हरमनप्रीत आणि पूजा वस्त्राकार या जोडीनं टीमला सावरलं. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेहमीच चांगलं खेळण्यासाठी हरमन ओळखली जाते. या वर्ल्ड कपमध्येही ती फॉर्मात आहे. हरमननं ऑस्ट्रेलिया विरूद्धही तो फॉर्म कायम ठेवला. तिने 47 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीनं नाबाद 57 रन केले. तर भारतीय इनिंगच्या शेवटच्या बॉलवर रन आऊट होण्यापूर्वी पूजानं 28 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 34 रन काढले होते. SA vs BAN : बांगलादेशनं रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर मिळवला पहिला विजय टीम इंडियाची या स्पर्धेतील ही पाचवी मॅच आहे. भारतीय टीमनं यापूर्वी झालेल्या चार मॅचपैकी 2 मॅच जिंकल्या असून 2 मध्ये पराभव स्वीकारला आहे. टीम इंडिया सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसरिकडं ऑस्ट्रेलियानं आजवर 4 पैकी 4 मॅच जिंकल्या असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Team india

    पुढील बातम्या