मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

SA vs BAN : बांगलादेशनं रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर मिळवला पहिला विजय

SA vs BAN : बांगलादेशनं रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर मिळवला पहिला विजय

बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) सेंच्युरियन सुपरस्पोर्ट्स पार्कवर झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे.

बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) सेंच्युरियन सुपरस्पोर्ट्स पार्कवर झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे.

बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) सेंच्युरियन सुपरस्पोर्ट्स पार्कवर झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 19 मार्च : बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) सेंच्युरियन सुपरस्पोर्ट्स पार्कवर झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशनं या मॅचमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेला (Bangladesh vs South Africa) 38 रननं हरवले. बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील हा पहिलाच विजय आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटींग करत शाकिब अल हसन, लिटन दास आणि यासिर अली यांच्या अर्धशतकामुळे 314 रन केले. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची टीम 276 रनवर ऑल आऊट झाली. 77 रनची आक्रमक खेळी करणारा ऑल राऊंडर शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या बांगलादेशला कॅप्टन शाकिब अल हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 95 रनची भागिदारी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाकिब अल हसननं 64 बॉलमध्ये सात फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं 77 रन केले. त्याचबरोबर लिटन दास आणि यासिर अली यांनी प्रत्येकी 50 रन केले. बांगलादेशनं शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 180 रन केले. 314 हा त्यांचा आफ्रिकेतील पिचवर सर्वोच्च स्कोअर आहे. दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. जानेमन मलान चार रन काढून आऊट झाला. तर एडेन मार्करम शून्यावर परतला. दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 आऊट 36 झाली होती. त्यानंतर कॅप्टन तेम्बा बावूमानं रासी व्हेन डर डुसेनसोबत चौथ्या विकेटसाठी 85 रनची भागिदारी करत इनिंग सावरली. IPL 2022 : KL राहुलच्या लखनऊला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट त्यानंतर रासी आणि डेव्हिड मिलरनं पाचव्या विकेटसाठी 60 रनची भागिदारी केली. रासीनं आफ्रिकेकडून सर्वात जास्त 86 रन केले. तर मिलरनं 57 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 79 रन केले. बांगलादेशकडून मेहदी हसननं 4 विकेट्स घेतल्या.
First published:

Tags: Bangladesh cricket team, Cricket news, South africa

पुढील बातम्या