मुंबई, 11 जुलै : आंद्रे रसेल (Andre Russell) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayane Bravo) यांची फटकेबाजी आणि हेटमायरचं (Shimron Hetmyer) अर्धशतक यांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाचा 56 रननं पराभव केला आहे. वेस्ट इंडिजचा या मालिकेतील हा सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे 5 टी20 सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजनं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजकडून पहिल्यांदा बॅटींग करताना 4 आऊट 196 रन काढले. हेटमायरनं सर्वाधिक 61 रनची खेळी केली. या खेळीत त्यानं 4 सिक्स लगावले. हेटमायर आऊट झाल्यानंतर ब्राव्हो आणि रसेल या अनुभवी जोडीनं रनरेट कमी होणार नाही याची दक्षता घेतली. ब्राव्होनं नाबाद 47 रन काढले. तर रसेलनं फक्त 8 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 24 रन काढले. रसेलनं पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या मॅचमध्येही आक्रमक खेळी केली आहे. त्याचा हा फॉर्म आगामी आयपीएल स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) दिलासा देणारा आहे.
Andre Russell finishes with 24* (8) to put an exclamation mark on proceedings!@WindiesCricket finish 196/4!https://t.co/oU2jJEIKp3 | #WIvAUS pic.twitter.com/x7qVx2oB0I
— ICC (@ICC) July 11, 2021
ऑस्ट्रेलियाला 197 रनचे आव्हान पेलवले नाही. त्यांची टीम 19.2 ओव्हर्समध्ये 140 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शनं सर्वाधिक 54 रनची खेळी केली. मार्शचा अपवाद वगळता एकाही ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मेस्सीला स्वप्नपूर्तीनंतर आठवला नेयमार! दोघांच्या गळाभेटीचा इमोशनल VIDEO VIRAL वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शेल्डन कॉट्रेलनं 2 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. कायरन पोलार्डच्या अनुपस्थितीमध्ये या मॅचमध्येही निकोलस पूरन वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता.