रिओ डी जानेरो, (ब्राझील) 11 जुलै : कोपा अमेरिका (Copa America 2021) स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेटींनानं ब्राझीलचा (Argentina vs Brazil) 1-0 नं पराभव केला आहे. रिओ डी जानेरोमध्ये झालेल्या फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) अर्जेंटीनानं तब्बल 28 वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी अर्जेंटीनानं 1993 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदाबरोबरच अर्जेंटीनाकडून मोठी स्पर्धा जिंकण्याचे मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. एंजल डी मारियानं (Angel de Maria) मेस्सीचं स्वप्न पूर्ण केलं. त्याने 22 व्या मिनिटाला फायनलमधील एकमेव गोल केला. त्यानंतर दोन्ही टीमनं जोरदार चाली करत गोल करण्याचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
Gol fantastis Di Maria 🤩
— GOAL Indonesia (@GOAL_ID) July 11, 2021
1️⃣ - 1️⃣0️⃣ berapa nilainya?pic.twitter.com/ky2JvNqZvD
ब्राझीलची टीम शेवटच्या मिनिटांमध्ये बरोबरी करत मॅच अतिरिक्त वेळेत नेईल अशी त्यांच्या फॅन्सना अपेक्षा होती. मात्र घरच्या मैदानावर विजेतेपद जिंकण्याचं ब्राझीलचं स्वप्न अपूर्ण राहिले. तर मेस्सी आणि अर्जेंटीनाच्या टीममध्ये जल्लोष होता. या विजयानंतर मेस्सीनं थेट ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटून नेयमारची (Neymr) भेट घेतली. जागतिक फुटबॉल गाजवणारे या दोन्ही दिग्गजांनी फायनलमध्ये आपल्या देशाला जिंकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामध्ये अखेर मेस्सीनं बाजी मारली. पण मेस्सीला या विजयानंतर नेयमारचीच पहिल्यांदा आठवण झाली. या दोघांच्या गळभेटीचा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
This moment between Neymar and Messi.
— B/R Football (@brfootball) July 11, 2021
Respect ❤️
(🎥: @FOXSoccer)pic.twitter.com/oQJcuW3J3I
28 वर्षांनंतर अर्जेंटीनाचं स्वप्न पूर्ण; मेस्सीच्या टीमनं ब्राझीलचा 1-0 ने उडवला धुव्वा मेस्सीच्या कॅप्टनसीमध्ये अर्जेंटीनानं फिफा वर्ल्ड कप 2014 च्या फायनलमध्ये धडक मारली होती. जर्मनीने फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2016 साली मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घोषणा केली होती. अर्जेंटीनाच्या राष्ट्रपतीच्या विनंतीनंतर त्याने हा निर्णय मागे घेतला. यावर्षी झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत मेस्सी जुन्या फॉर्मात दिसला. त्याने स्पर्धेत चार गोल केले. त्याचबरोबर पाच गोल करण्यास खेळाडूंना मदत केली.