मुंबई, 10 जुलै : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) यांच्यात झालेली पहिली टी20 मॅच ऑस्ट्रेलियानं खराब बॅटींगमुळे गमावली. वेस्ट इंडिजने दिलेल्या 146 रनचा पाठलाग ऑस्ट्रेलियान सहज करेल असा अंदाज होता. ऑस्ट्रेलियाने 10 व्या ओव्हरमध्येच 100 रन पूर्ण केले होते. त्यानंतर अवघ्या 5 ओव्हरमध्ये त्यांची बॅटींग गडगडली आणि वेस्ट इंडिजने 18 रनने विजय मिळवला. या विजयाबरोबरच 5 टी20 सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजनं 1-0 नं आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजला धक्का
पहिली मॅच सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला धक्का बसला. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) दुखापतीमुळे या मॅचमधून आऊट झाला. पोलार्डच्या अनुपस्थितीमध्ये निकोलस पूरननं (Nicholas Pooran) टीमचं नेतृत्त्व केलं. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 146 पर्यंत मजल मारली.
आंद्रे रसेलचं (Andre Russell) अर्धशतक हे वेस्ट इंडिजच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. रसेलनं 28 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 51 रन काढले. रसेलनं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील हे पहिलंच अर्धशतक आहे. रसेलचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजच्या अन्य बॅट्समना मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. सिमन्सनं 27 तर हेटमायरनं 20 रन काढले.
5️⃣0️⃣ in style!@Russell12A gets his maiden T20I half century for the #MenInMaroon off just 26 balls.
Live Scorecard⬇️https://t.co/C63tCIp0XF pic.twitter.com/vqxQqF4UE6 — Windies Cricket (@windiescricket) July 10, 2021
5 ओव्हरमध्ये फिरली मॅच
ऑस्ट्रेलियानं विजयाच्या दिशेनं भक्कम वाटचाल सुरु केली होती. ऑस्ट्रेलियाला 10 ओव्हरनंतर विजयासाठी 41 रन हवे होते आणि त्यांच्या 5 विकेट्स शिल्लक होत्या. त्यानंतर मकॉयच्या (Obed McCoy) भेदक बॉलिंगमुळे मॅच फिरली. मकॉयनं 26रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम 16 ओव्हरमध्येच 127 रनवर ऑल आऊट झाली.
No greater feeling as a Maroon fan than a moment like this...Good win boys!🙌🏾 #WIvAUS #MissionMaroon pic.twitter.com/yaZSPUVLVY
— Windies Cricket (@windiescricket) July 10, 2021
हरलीन बनली Superwomen! हवेत उडी घेत पकडला अविश्वसनीय कॅच, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शनं सर्वाधिक 51 रन काढले. मकॉयला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, West indies