मुंबई, 10 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड (IND W vs ENG W) यांच्यात झालेल्या पहिल्या मॅचचा निकाल पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानं (Duckworth Lewis Rule) लागला. इंग्लंडने पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 177 रन केले होते. त्यानंतर टीम इंडियाला विजयासाठी 8.4 ओव्हरमध्ये 73 रनची आवश्यकता होती. भारतीय टीमला 3 आऊट 54 पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे इंग्लंडने पहिली मॅच इंग्लंडने 18 रनने जिंकली. आता या मालिकेतील दुसरा सामना 11 जुलै रोजी होणार आहे.
भारतीय बॅटर हरलीन देओलनं (Harleen Deol) घेतलेल्या अविश्वसनीय कॅचमुळे पहिली मॅच गाजली. हरलीननं 19 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बाऊंड्रीच्या जवळ हा थरारक कॅच घेतला. इंग्लंडची विकेट किपर एमी जोन्सनं (Ami Jones) सिक्स मारण्याच्या उद्देशानं तो बॉल टोलावला होता.
OMG @imharleenDeol take a bow!! Calling it now the best we will see this series!! pic.twitter.com/O4Dwm4OYlU
— Lisa Sthalekar (@sthalekar93) July 9, 2021
इंग्लंडला चिअर करायला स्टेडियमवर गेली, TV वरही झळकली आणि त्यानंतर भलतच घडलं!
शिखा पांडेच्या बॉलिंगवर जोन्सनं लगावलेला तो फटका सहज बाऊंड्रीच्या पार जाईल असा सर्वांचा अंदाज होता. पण, हरलीनच्या मनात काही तरी वेगळे होते. हरलीननं कॅच पकडण्यासाठी हवेत उडी मारली. तिच्यात आणि बाऊंड्री लाईनमध्ये काही सेंटीमीटरचेच अंतर होते. त्यावेळी तिने बॉल वर फेकला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर उडी मारली. त्यानंतर डोळ्याचं पात लवण्याच्या आत हरलीननं आतमध्ये उडी मारत हवेत तो कॅच पकडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Video Viral On Social Media