मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : '...तर मी पुढील IPL खेळणार नाही', सुरेश रैनाची मोठी घोषणा

IPL 2022 : '...तर मी पुढील IPL खेळणार नाही', सुरेश रैनाची मोठी घोषणा

आयपाीएलचा पुढील सिझन (IPL 2022) 10 टीममध्ये होणार आहे. या आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) मोठी घोषणा केली आहे.

आयपाीएलचा पुढील सिझन (IPL 2022) 10 टीममध्ये होणार आहे. या आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) मोठी घोषणा केली आहे.

आयपाीएलचा पुढील सिझन (IPL 2022) 10 टीममध्ये होणार आहे. या आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) मोठी घोषणा केली आहे.

मुंबई, 10 जुलै : आयपाीएलचा पुढील सिझन (IPL 2022) 10 टीममध्ये होणार आहे. या आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) मोठी घोषणा केली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असं रैनानं जाहीर केलं आहे. आयपीएल स्पर्धेचा चौदावा सिझन (IPL 2021) कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे स्थगित करावा लागला होता. आता उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहेत.

सुरेश रैनानं न्यूज 24 च्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'माझ्याकडे चार-पाच वर्ष बाकी आहेत. आम्ही यावर्षी आयपीएल खेळत आहोत. पुढील सिझनमध्ये आणखी दोन टीम आयपीएलमध्ये वाढणार आहेत. मी पुढच्या सिझनमध्येही सीएसकेकडून खेळेल अशी मला आशा आहे.'

... तर मी खेळणार नाही

सुरेश रैनानं पुढे म्हणाला, 'धोनी भाई पुढील सिझन खेळणार नसतील तर मी देखील खेळणार नाही. आम्ही 2008 पासून सीएसकेकडून खेळत आहोत. या सिझनमध्ये आम्ही जिंकलो तर मी त्याला पुढच्या सिझनमध्येही खेळ असे सांगेल. त्याने मला पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. तो खेळला नाही तर मी दुसऱ्या आयपीएल टीमकडून खेळेल असं मला वाटत नाही.' असे रैनाने स्पष्ट केले.

महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. चेन्नईसाठी मागचा सिझन निराशाजनक ठरला होता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. या सिझनमध्ये चेन्नईनं कमबॅक केलं आहे. कोरोनामुळे स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती.

.. तर क्रिकेटर नाही मासेमार बनले असते गावसकर! लिटल मास्टरची फिल्मी गोष्ट, VIDEO

महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे त्यानंतर काही वेळातच सुरेश रैनानं देखील निवृत्ती जाहीर केली होती.

First published:

Tags: Ipl, MS Dhoni, Suresh raina