मुंबई, 11 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कप नंतर आता इंडियन क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया मर्यादित ओव्हरची सीरीज खेळणार आहे. वर्ल्ड कपनंतर लगेच होणाऱ्या या सीरिजमधील भारतीय टीममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. या खेळाडूंबरोबरच हेड कोच राहुल द्रविडलाही विश्रांती देण्यात आली आहे. मागील एका वर्षापासून टीम इंडियाचे मुख्य कोच असलेल्या द्रविड यांच्या कोचिंगमध्ये टीमने आयसीसी टूर्नामेंटमध्ये विशेष कामगिरी केलेली नाही. टीमला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. आशिया कपमध्येही टीमला यश मिळालं नाही. द्रविडच्या टीम निवडीवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात द्रविडच्या अनुपस्थितीमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य कोच असतील. रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडिया अॅडिलेडच्या ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळली. यात इंग्लंडच्या टीमनं 10 विकेट राखून बाजी मारली. जोस बटलर आणि त्याच्या कंपनीनं उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सेमीफायनलमध्ये भारतीय टीम सपेशल अपयशी ठरले. रोहितची कॅप्टनसी जाणार, काही जण निवृत्त होणार! गावसकरांनी सांगितली नवी टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमसोबत असलेले मुख्य कोच राहुल द्रविड, बॉलिंगचे कोच पारस म्हांब्रे आणि बॅटिंगचे कोच विक्रम राठोड हे आता टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियातून भारतात परतणार आहेत. त्यांना सध्या विश्रांती दिली जाणार असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटलं आहे. आराम झाल्यानंतर सर्व कोचिंग स्टाफ भारतीय टीमसोबत पुन्हा बांग्लादेश टूरवर जाईल. परंतु, न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत कोचिंग स्टाफमध्ये लक्ष्मणसह बॅटिंग कोच हृषीकेश कानिटकर आणि बॉलिंग कोच सईराज बहुतुले असतील. व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये अध्यक्ष आहेत. यंदाच्या वर्षी लक्ष्मण हे टीम इंडियासोबत आयर्लंड आणि झिम्बावेच्या दौऱ्यावर होते. टी-20 वर्ल्ड कप आधी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध घरच्या ग्राउंडवर खेळवल्या गेलेल्या सीरीजमध्येही लक्ष्मण टीम इंडियासोबत होते. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पुन्हा हाराकिरी, पराभवाची 5 कारणं न्यूझीलंडविरुद्ध सीरिजचं वेळापत्रक टी-20 सीरिजच्या माध्यमातून टीम इंडिया या दौऱ्याची सुरूवात करणार आहे. 3 मॅचच्या सीरिजमधील पहिली टी-20 मॅच 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. टी-20 सीरिजनंतर भारतीय टीम 3 मॅचची वन-डे सीरिज खेळणार आहे. टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाइस कॅप्टन), ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि अर्शदीपसिंग. चाहत्यांचा हार्ट ब्रेक, रोहित शर्माही रडला; पण ‘हा’ खेळाडू होतोय जोरदार ट्रोल वन-डे सीरिजसाठी टीम इंडिया शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाइस कॅप्टन), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि अर्शदीपसिंग.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.