जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: ‘हरलो तरी फरक पडत नाही...’ विराट कोहलीचं मोठं वक्तव्य!

WTC Final: ‘हरलो तरी फरक पडत नाही...’ विराट कोहलीचं मोठं वक्तव्य!

WTC Final: ‘हरलो तरी फरक पडत नाही...’ विराट कोहलीचं मोठं वक्तव्य!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC Final 2021) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने एक मोठं वक्तव्य केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

साऊथम्पटन, 18 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC Final 2021) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने एक मोठं वक्तव्य केले आहे. आम्ही इंग्लंडमध्ये फक्त ही फायनल मॅच खेळण्यासाठी आलेलो नाही. आमच्यासाठी फायनलनंतर होणारी इंग्लंड विरुद्धची पाच टेस्ट मॅचची मालिका देखील तितकीच महत्त्वाची आहे, असं विराटनं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर टीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकू किंवा हरू टीमची विचार करण्याची आणि खेळण्याची पद्धत बदलणार नाही, असं विराटनं स्पष्ट केले आहे. ‘मोठी मॅच नाही’ “ही माझ्यासाठी सर्वात मोठी मॅच नाही. ही अन्य एक मॅचसारखीच आहे. आम्ही टीम म्हणून या मॅचमध्ये काय होणार याचा फार विचार करत नाही. याची काळजी न करता आम्ही ही मॅच खेळणार आहोत. आम्ही 2011 साली वर्ल्ड कप जिंकला. तो खूप मोठा क्षण होता. पण खेळ सुरुच असतो. तुम्ही कोणत्याही एका क्षणाची निवड करु शकत नाही. खेळण्याचा आनंद घेता आला पाहिजे. आमची ही मानसिकता आहे.” असे विराटने स्पष्ट केले. “एका मॅचमधील विजय किंवा पराभवानंतर कोणतीही टीम खराब असल्याचं सिद्ध होत नाही. ज्या लोकांना खेळ समजतो त्यांना हे समजते. एका मॅचच्या आधारावर कोणत्याही टीमसला बेस्ट म्हणता येत नाही. आम्ही ही मॅच हरलो किंवा जिंकलो तरी आमच्यासाठी खेळ थांबणार नाही.” असे विराट यावेळी म्हणाला. ऑस्ट्रेलियन टीममधून काढलेल्या बॅट्समनचे दमदार शतक, 13 फोर आणि 3 सिक्सचा वर्षाव विल्यमसन चांगला मित्र पण… “मी आणि केन विल्यमसन (Kane Williamson) चांगले मित्र आहोत. पण मैदानाच्या आत गेल्यानंतर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून. मैदानात आम्ही दोघंही आमची टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यूझीलंडला हरवण्याची आमची इच्छा आहे न्यूझीलंडच नाही तर कोणत्याही टीममधील खेळाडू वाईट नाहीत. ही एक मोठी मॅच आहे. आम्ही ती जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत.” असे विराटने यावेळी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात