मुंबई, 18 जून : ऑस्ट्रेलियन टीममधून बराच काळ बाहेर असलेला बॅट्समन उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) दमदार शतक झळकावलं आहे. ख्वाजानं इस्लामाबाद युनायटेडकडून खेळताना 53 बॉलमध्येच शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे इस्लामाबादनं पेशावर जाल्मीसमोर विजयासाठी 248 रनचे विशाल लक्ष्य ठेवले. पेशावरनं या मोठ्या टार्गेटचा जिद्दीनं पाठलाग केला, पण त्यांचे प्रयत्न 15 रननं कमी पडले. पेशावरचा कॅप्टन वहाब रियाझ याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. ओपनिंगला उतरलेल्या इस्लामाबादचा कॅप्टन ख्वाजानं पहिल्यापासूनच आक्रमक खेळ केला आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. ख्वाजानं शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सिक्स लगावत शतक पूर्ण केले. त्याने 56 बॉलमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 105 रन काढले. 34 वर्षांच्या ख्वाजनं तिसऱ्या विकेटसाठी ब्रँडन किंगसोबत नाबाद शतकी भागिदारी केली. इस्लामाबादकडून कॉलीन मुन्रो (48), आसिफ अली (43) आणि ब्रँडन किंग नाबाद (46) यांनी उत्तम योगदान दिले. पेशावरकडून सायमन गुल आणि शोएब मलिकनं प्रत्येकी एक विकेट घेतली. WTC Final Live Streaming: ‘इथे’ पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांची ऐतिहासिक टेस्ट शोएब-कमरानचा प्रतिकार पेशावरकडून 248 रनचा पाठलाग करताना कमरान अकमल (Kamran Akmal) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी अर्धशतक झळकावले. अकमलने 53 तर मलिकनं 68 रनची खेळी केली. मात्र पेशावरला वेगानं रन जमावण्यात अपयश आले. पेशावरनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 232 पर्यंत मजल मारली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







