मुंबई, 17 जानेवारी : विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) ही क्रिकेटजगतातली (cricket) दोन सेलिब्रिटी नावं. दोघांचे चाहते केवळ देशात नाही तर जगभर आहेत. त्यांच्या चाहत्यांमध्ये भर टाकणारी दोघांची अनोखी अदा सोशल मीडियावर (social media) सध्या चांगलीच व्हायरल (viral) झाली आहे. विशेष म्हणजे मिमिक्रीच्या माध्यमातून या दोघांनी मस्त विनोदी सादरीकरण केलं आहे. विराट कोहली आणि धोनी दोघांनीही एका जुन्या लोकप्रिय सिनेमातील गाण्यावर (song) ही पेशकश चाहत्यांसमोर ठेवली आहे. या व्हिडीओमध्ये (video) हे दोघं ‘मेरे सामनेवाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है’ या लोकप्रिय गाण्यावर कमालीचे सहजसुंदर एक्स्प्रेशन्स देत आहेत. चाहत्यांनी (fans) साहजिकच या व्हिडीओला उचलून धरलं आहे.
या दोघांचा हा व्हिडीओ आवर्जून पाहण्यासारखा आहे. पडोसन (Padosan) या एव्हरग्रीन सिनेमातलं (old Bollywood movie) रोमँटिक गाणं म्हणजे ‘मेरे सामनेवाली खिडकी में…’ फेस ऍपच्या (face app) माध्यमातून या गाण्यात किशोर कुमार (kishore kumar) यांच्याजागी धोनीचा चेहरा लावला गेलाय. आणि सुनील दत्त यांच्या चेहऱ्यावर विराटचा चेहरा लावला आहे. गाण्यात शेवटी दिसणाऱ्या सायरा बानो यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) चेहरा. हा व्हिडीओ शेअरचॅट (share chat) या ऍपच्या माध्यमातून शेअर केला गेला आहे. जो कोणी हा व्हिडीओ पाहतो आहे, तो एकच म्हणतो - काय कमाल एडिटिंग केली आहे… वा! एक युजर म्हणतो, या बनवणाऱ्याला तर अवॉर्ड द्यायला पाहिजे.