मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारताचे दिग्गज स्पिनर चंद्रशेखर यांची तब्येत खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल!

भारताचे दिग्गज स्पिनर चंद्रशेखर यांची तब्येत खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल!

भारतीय क्रिकेट टीमचे गुगली मास्टर बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

भारतीय क्रिकेट टीमचे गुगली मास्टर बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

भारतीय क्रिकेट टीमचे गुगली मास्टर बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बंगळुरू, 18 जानेवारी : भारतीय क्रिकेट टीमचे गुगली मास्टर बीएस चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 75 वर्षांच्या चंद्रशेखर यांना स्ट्रोक आल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

म्हैसूरमध्ये 1945 साली जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 58 टेस्ट आणि 1 वन-डे मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 58  टेस्टमध्ये त्यांनी 2.70 च्या इकॉनॉमी रेटनं 242 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 12 वेळा 4 विकेट्स, 16 वेळा 5 विकेट्स आणि 2 वेळा 10 विकेट्स घेण्याच्या पराक्रमाचा समावेश आहे.

चंद्रशेखर यांनी 1964 मध्ये मुंबईत इंग्लंडच्या टीमविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याच टीमविरुद्ध 1979 साली त्यांनी शेवटची टेस्ट मॅच खेळली. त्यांनी 1976 साली न्यूझीलंडविरुद्ध एकमेव वन-डे मॅच खेळली होती. त्यामध्ये त्यांनी तीन विकेट्स घेतल्या.

(वाचा - शाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका!)

जगातील फक्त दुसरे क्रिकेटपटू!

टेस्ट क्रिकेटमधील एकूण रन्सपेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या जगातील दोन क्रिकेटपटूंमध्ये चंद्रशेखर यांचा समावेश आहे. चंद्रशेखर यांनी 58 टेस्टमधील 80 डावात एकूण 167 रन काढले. तर 242 विकेट्स घेतल्या. एकूण रन पेक्षा जास्त विकेट घेणारा दुसरा बॉलर न्यूझीलंडचा ख्रिस मार्टीन आहे. मार्टिननं 71 टेस्टमध्ये 233 विकेट्स घेतल्या आणि फक्त 123 रन काढले.

चंद्रशेखर यांचा ‘1972 साली विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. तसंच 2002 साली भारताने त्यांचा शतकातील सर्वश्रेष्ठ बॉलिंग प्रदर्शनासाठी गौरव केला होता. चंद्रशेखर यांनी 1971 साली इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल टेस्टमध्ये 38 रन देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या.

(वाचा - 'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया)

चंद्रशेखर यांचा एक हात पोलिओग्रस्त आहे. त्यावर जिद्दीने मात करत त्यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं. 70 च्या दशतात बेदी-प्रसन्ना आणि चंद्रशेखर या फिरकी त्रिकुटाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा होता.

First published:

Tags: Cricket