जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup: भारतीय बॉलरची कमाल, एकाच ओव्हरमध्ये केली दोन्ही हातांनी बॉलिंग! VIDEO

U19 World Cup: भारतीय बॉलरची कमाल, एकाच ओव्हरमध्ये केली दोन्ही हातांनी बॉलिंग! VIDEO

U19 World Cup: भारतीय बॉलरची कमाल, एकाच ओव्हरमध्ये केली दोन्ही हातांनी बॉलिंग! VIDEO

अंडर 19 वर्ल्ड कपला (Under-19 World Cup) सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये भारतीय बॉलरने दोन्ही हाताने बॉलिंग करत सर्वांना चकित केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपला (Under-19 World Cup) सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेत यजमान वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाने त्यांचा 6 विकेट्सने (West Indies vs Australia) पराभव केला. वेस्ट इंडिजची टीम 40.1 ओव्हर्समध्ये 169 रनवर ऑल आऊट झाली. त्यांचे 7 खेळाडू दोन अंकी रन करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने 170 रनचे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन स्पिनर निवेथन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) या मॅचचे आकर्षण ठरला. त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन्ही हाताने बॉलिंग करत सर्वांना चकित केले. राधाकृष्णन 10 ओव्हर्समध्ये 48 रन देत 3 विकेट्स घेतल्या. टॉम विटने आणि कूपर कनॉले यांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजकडून कॅप्टन अकीम औगुस्तेने सर्वात जास्त 57 रन काढले. त्याचबरोबर विकेट किपर रिवाल्डो क्लार्कने 37 रन केले. वेस्ट इंडिजचे 7 बॅटर दोन अंकी रन देखील करू शकले नाहीत.

जाहिरात

कोण आहे राधाकृष्णन? राधाकृष्णन आयपीएल स्पर्धेत (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) नेट बॉलर होता. त्याचे कुटुंब 2013 साली सिडनीमध्ये स्थायिक झाले. ऑस्ट्रेलियातील अंडर 19 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत त्याने वर्ल्ड कप टीममध्ये जागा मिळवली आणि पहिल्याच मॅचमध्ये सर्वांना प्रभावित केले. राधाकृष्णननच्या यशात त्याच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. ते तामिळनाडूमध्ये ज्युनिअर क्रिकेट खेळले आहेत. IND vs SA : पुजारा-रहाणेचं भवितव्य काय? विराटने दिलं थेट उत्तर भारताविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राधाष्णन फार प्रभाव टाकू शकला नव्हता. त्याने भारताविरुद्ध 8 ओव्हर्समध्ये 40 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचा या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप D मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये यजमान वेस्ट इंडिजसह श्रीलंका आणि स्कॉटलंड टीमचा समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमधील टॉप 2 टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात