Home /News /sport /

U 19 World Cup : आता भारत-पाकिस्तान सेमी फायनल नाही, ऑस्ट्रेलियानं केली फॅन्सची निराशा

U 19 World Cup : आता भारत-पाकिस्तान सेमी फायनल नाही, ऑस्ट्रेलियानं केली फॅन्सची निराशा

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील थरारक लढतीकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली आहे.

    मुंबई, 29 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील थरारक लढतीकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली आहे. शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा (Australia vs Pakistan) 119 रननं मोठा पराभव केला. आता ऑस्ट्रेलियाची सेमी फायनलमध्ये लढत भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. ऑस्ट्रेलियानं शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 आऊट 276 रन केले. त्याला उत्तर देताना पाकिस्तानची टीम 50 ओव्हर्स खेळू देखील शकली नाही. त्यांची टीम 35. 1 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्ताननं हा सामना जिंकला असता तर सेमी फायनलमध्ये त्यांची लढत भारताविरूद्ध होण्याची शक्यता होती. पण, आता तसं होणार नाही. पाकिस्तानचा कॅप्टन कासिम अक्रमनं टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या अंगाशी आला. ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरनं चांगली सुरूवात केली. टेग विली आणि कँपबेल केलावे यांनी पहिल्या विकेटसाठी 86 रनची भागिदारी केली कँपबल 47 रन काढून आऊट झाला. पण, विलीनं या वर्ल्ड कपमधील दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं सर्वाधिक 71 रन केले. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कोरी मिलरनं 64 रनची खेळी केली. U19 WC, IND vs BAN : टीम इंडियाच्या कॅप्टनसह 5 खेळाडू कोरोनामधून परतले, पण... ऑस्ट्रेलियानं दिलेलं 277 रनचं आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाही. पाकिस्ताननं पहिल्या 5 ओव्हर्समध्येच 2 विकेट्स गमावल्या. ठराविक अंतरानं विकेट्स गमावल्यानं पाकिस्ताननं 100 रनच्या आत 7 विकेट्स गमावल्या होत्या. त्यांची संपूर्ण टीम 35. 1 ओव्हर्समध्ये 157 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानकडून मेहरान मुमताजनं सर्वाधिक 29 रन केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket, Pakistan, Team india

    पुढील बातम्या