जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup : अफगाणिस्तान विरूद्ध निघाला ऑस्ट्रेलियाचा घाम, भारतीय खेळाडूमुळे वाचली लाज

U19 World Cup : अफगाणिस्तान विरूद्ध निघाला ऑस्ट्रेलियाचा घाम, भारतीय खेळाडूमुळे वाचली लाज

U19 World Cup : अफगाणिस्तान विरूद्ध निघाला ऑस्ट्रेलियाचा घाम, भारतीय खेळाडूमुळे वाचली लाज

अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला हरवण्यासाठी (Australia vs Afghanistan) चांगलाच घाम गाळावा लागला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला हरवण्यासाठी (Australia vs Afghanistan) चांगलाच घाम गाळावा लागला. अफगाणिस्तानने दिलेलं 202 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियानं शेवटच्या ओव्हर्समध्ये 2 विकेट्स राखून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमध्ये भारताकडून तर अफगाणिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. दोन्ही टीमनं तिसरा क्रमांक पटकावण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. मुळचा भारतीय असलेला निवेथन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) हा या विजयाचा हिरो ठरला. त्याने ऑल राऊंड खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळला. पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. त्यांनी 95 रनमध्ये 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यांचे 6 खेळाडू दोन अंकी रन देखील करू शकले नाहीत. त्यावेळी एजाज अहमदनं एक बाजू लावून धरली होती. त्याने सर्वात जास्त 81 रन केले. एजाजच्या खेळीमुळे अफगाणिस्ताननं 201 पर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या बॉलर्सनी हा छोटा स्कोअर देखील आव्हानात्मक केला होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात राधाकृष्णननं महत्त्वाची भूमिका बजावली. तो मुळचा तामिळनाडूचा आहे. त्याच्या कुटुंबाने 2013 साली ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले. त्याने सुरूवातीला 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर बॅटींगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मिळलेल्या प्रमोशनचा फायदा घेत 96 बॉलमध्ये 66 रन केले. U19 World Cup Final : भारत-इंग्लंड फायनलमध्ये 5 खेळाडू ठरणार निर्णायक, एकहाती मॅच जिंकवण्याची क्षमता ऑस्ट्रेलियानं 45 व्या ओव्हरपर्यंत 5 आऊट 193 रन केले होते. त्यानंतरच्या तीन ओव्हर्समध्ये अफगाणिस्ताननं चांगलीच झुंज दिली. अफगाणिस्ताननं पुढील 3 ओव्हरमध्ये फक्त 3 रन देत 3 विकेट्स घेत मॅचमध्ये रंगत निर्माण केली होती. त्यानंतर 49 व्या ओव्हरमध्ये 4 रन निघाले. अखेर गार्नरनं शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 2 रन करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑल राऊंड कामगिरी करणारा राधाकृष्णन या विजयाचा हिरो ठरला. त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरास्कार देऊन गौरवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात