जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup Final : भारत-इंग्लंड फायनलमध्ये 5 खेळाडू ठरणार निर्णायक, एकहाती मॅच जिंकवण्याची क्षमता

U19 World Cup Final : भारत-इंग्लंड फायनलमध्ये 5 खेळाडू ठरणार निर्णायक, एकहाती मॅच जिंकवण्याची क्षमता

U19 World Cup Final : भारत-इंग्लंड फायनलमध्ये 5 खेळाडू ठरणार निर्णायक, एकहाती मॅच जिंकवण्याची क्षमता

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (U19 World Cup 2022 Final) आज (शनिवारी) होत आहे. या मॅचमध्ये 5 खेळाडू निर्णायक ठरणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (U19 World Cup 2022 Final) आज (शनिवारी) होत आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (India U19 vs England U19) यांच्यात ही फायनल होत असून दोन्ही टीमनं संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. सेमी फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता दोन्ही टीममधील फायनल रंगतदार होण्याची शक्यता असून या मॅचमध्ये 5 खेळाडू हे निर्णायक ठरू शकतात. यश खेळणार मोठी खेळी टीम इंडियाचा कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) हा या स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आहे. त्याने तीन मॅचमध्ये 106 च्या सरासरीने 212 रन काढले आहेत. विराट कोहलीला आदर्श मानणाऱ्या यशनं सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध 110 रनची खेळी केली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 89 रन काढले होते. फायनलमध्येही त्याची नजर मोठ्या खेळीवर असेल. रघुवंशी फॉर्ममध्ये अंगक्रिश रघुवंशीनं (Angkrish Raghuvanshi) या स्पर्धेत आत्तापर्यंत 55.60 च्या सरासरीनं 278 रन केले आहेत. तो टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन करणारा बॅटर आहे. रघुवंशीनं या स्पर्धेत 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. त्यानं युगांडा विरूद्ध शतक तर आयर्लंड विरूद्ध अर्धशतक झळकावले होते. फायनलमध्ये तो टीम इंडियाला मजबूत सुरूवात करून देऊ शकतो. इंग्लंडचा आधारस्तंभ इंग्लंडचा कॅप्टन टॉम प्रेस्ट (Tom Prest) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्याने 5 सामन्यात 73 च्या सरासरीनं 292 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 103.91 आहे. प्रेस्टनं यूएई विरूद्ध शतक आणि कॅनडा विरूद्ध अर्धशतक झळकावलं आहे. प्रेस्ट इंग्लंडच्या बॅटींगचा आधारस्तंभ असून टीमला मोठा स्कोअर करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. U19 World Cup Final : कधी सुरू होणार IND vs ENG सामना? Live Streaming कुठे पाहाल? विकी ठरणार ट्रम्प कार्ड भारताकडे विकी ओस्तवाल (Vicky Ostwal) हा एक उत्तम डावखुरा स्पिन बॉलर आहे. ओस्तवालनं या स्पर्धेतील 5 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 3.39 इतका आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सेमी फायनलमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. विकी फायनलमध्ये भारताचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. ऑल राऊंडर बेथेल इंग्लंडचा जेकेब बेथेल (Jacob Bethell) हा उपयुक्त ऑल राऊंडर आहे. बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही क्षेत्रात त्याने इंग्लंडसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याने या स्पर्धेत 2 अर्धशतक झळकावली असून 3 विकेट घेतल्या आहेत. या डावखुऱ्या खेळाडूपासून भारताला सावध राहावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात