Home /News /sport /

जीव धोक्यात घालून केला 8300 किमी प्रवास, अफगाण क्रिकेटपटूची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

जीव धोक्यात घालून केला 8300 किमी प्रवास, अफगाण क्रिकेटपटूची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

अंडर 19 वर्ल्ड कपला (Under-19 World Cup) सुरूवात झाली आहे. मुळचा अफगाणिस्तानचा पण आता आयर्लंडचा टॉप बॉलर असलेल्या खेळाडूचा संघर्ष वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

    मुंबई, 15 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपला (Under-19 World Cup) सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील खेळाडू भविष्यातील सुपर स्टार होणार आहेत. 19 वर्षाखालील या खेळाडूंनी इथपर्यंत येण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. मुजमिल शेरजाद  (Muzamil Sherzad) हा मुळचा अफगाणिस्तानचा पण आता आयर्लंडचा टॉप बॉलर असलेल्या खेळाडूचा संघर्ष वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. त्याची ही गोष्ट एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजमधील गोष्टीपेक्षा कमी नाही. शेरजाद पाच वर्षांपूर्वी 14 वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या आईने एका दलालाच्या माध्यमातून त्याला आयर्लंडला पाठवण्याचे ठरवले. आयर्लंडमध्ये त्याचे काका नोकरी करत होते. शेरजाद जलादाबादमधून बाहेर पडला त्यावेळी त्याच्याकडे घरातील काही खाद्यपदार्थ आणि जवळपास 34 हजार रूपये होते. त्यानंतरचे 8-9 महिने तो अन्य प्रवासींसोबत पाकिस्तान, इराण, तुर्की, बुल्गारिया, सर्बिया, क्रोएशिया. इटली आणि फ्रान्स या देशांचा प्रवास करून आयर्लंडमध्ये पोहचला. या काळात त्याला चालणे, पळणे, जंगलात लपणे, बागेत झोपणे या सर्व अडचणी सहन कराव्या लागल्या. आयर्लंडमध्ये काकांकडे गेल्यावर क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:ची ओळख आणि मित्र बनवण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर तो आज आयर्लंडच्या टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. U19 World Cup: भारतीय बॉलरची कमाल, एकाच ओव्हरमध्ये केली दोन्ही हातांनी बॉलिंग! VIDEO जीवाला होता धोका  शेरजादने 'इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील आजवरचा संघर्ष सांगितला आहे. तो 5 वर्षांचा होता त्याचवेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबातील संपत्तीच्या वादामुळे त्याच्या जीवाला धोका होता. त्यामुळे आईने त्याला आयर्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला. शेरजादचा सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम आहे. पण, तो क्रोएशिया पार करताना शिबिरामध्ये देखील राहिला आहे. तिथून इटलीमध्ये जाण्यासाठी त्याने तीन-चार दिवस ट्रकमधून प्रवास केला आहे. फ्रान्समध्ये अंधारात त्याने बोटीतून प्रवास केला आहे. त्यावेळी प्रचंड थंडी होती, असे शेरजाद सांगतो. अखेर तो आयर्लंडमधील डब्लिन शहरात पोहचला. पण, तरीही  त्याच्या अडचणी संपल्या नव्हत्या. त्याला काकांचा पत्ता माहिती नव्हता. तसेच इंग्रजी देखील बोलता येत नव्हते. त्यावेळी त्याने बागेत उघड्यावर झोपून रात्र काढली आहे. अखेर त्याची एका आशियाई व्यक्तीची भेट झाली, त्याने त्याला निर्वासितांसाठी असलेल्या शिबिराचा पत्ता दिला. शेरजाद काकांची भेट होईपर्यंत तेथील चाईल्ड केअर होममध्ये राहत होता. WTC : टीम इंडियाचा मार्ग अडचणीत, आफ्रिकेतील पराभवानंतर आता प्रत्येक मॅच फायनल सेहवागचा फॅन शेरजाद त्याच्या काकासोबत फुड आऊटलेटमध्ये काम करत होता. दोन वर्षांपूर्वी एका क्रिकेट टॅलेंट स्पर्धेची जाहिरात पेपरमध्ये वाचून त्याने तिथे ट्रायल दिली. आयर्लंड क्रिकेट टीमचे टॅलेंट मॅनेजर अल्बर्ट मेर्वे त्याच्या खेळावर प्रभावित झाले. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) फॅन असलेल्या शेरजादला राशिद खान प्रमाणेच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. थ्री इडियट्स हा सिनेमा पाहून तो थोडं हिंदी बोलण्यास देखील आता शिकला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket news

    पुढील बातम्या