मुंबई, 15 जानेवारी : केपटाऊन टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया अडचणीत आली आहे. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज (India vs South Africa) जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) जिंकण्याच्या स्वप्नांना देखील धक्का बसला आहे. आता भारतीय टीमसाठी यापुढील प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. यामधील एक पराभवही टीमला फायनलच्या शर्यतीमधून बाद करू शकतो. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सिझनसाठी नवे नियम लागू केले आहेत. यापूर्वीच्या सिझनमध्ये टीमच्या विजयावर रँकिंग निश्चित होत असे. यंदा टेस्ट मॅचच्या एकूण टक्केवारीवर रँकिंग ठरणार आहे. सध्या टीम इंडियाने सर्वात जास्त 4 टेस्ट जिंकल्या आहेत. पण सर्वात जास्त 9 टेस्ट खेळल्या आहेत. त्यामुळे भारतीय टीम 49.07 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.
South Africa’s brilliant series win has placed them nicely in the latest #WTC23 standings 📈 pic.twitter.com/SJkLtZVpUS
— ICC (@ICC) January 14, 2022
श्रीलंकेनं फक्त 2 टेस्ट खेळल्या असून त्या दोन्हीमध्ये विजय मिळवल्यानं ही टीम 100 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियानं सर्वात जास्त 40 पॉईंट्स जिंकले असून ही टीम 83.33 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा नंबर आहे. IND vs SA : DRS प्रकरणात भारतीय खेळाडूंवर कारवाई होणार का? ICC ने दिले उत्तर टीम इंडियाला या सिझनमध्ये एकूण 18 टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. यापैकी 9 टेस्ट शिल्लक आहेत. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 2, इंग्लंड विरुद्ध 1, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 तर बांगलादेश विरुद्ध 2 टेस्ट खेळायच्या आहेत. भारतीय टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी या सर्व टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. उर्वरित 9 टेस्टमधील एखाद्या टेस्टमधील पराभव देखील टीम इंडियाला फायनलच्या शर्यतीतून बाहेर काढणारा ठरू शकतो.