मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'आता तरी सूर्यकुमारला संधी द्या', फ्लॉप शो नंतर क्रिकेट फॅन्सची मागणी

IND vs ENG : 'आता तरी सूर्यकुमारला संधी द्या', फ्लॉप शो नंतर क्रिकेट फॅन्सची मागणी

 इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs England T20 Series) भारतीय ओपनर केएल राहुलचा खराब खेळ सुरू आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs England T20 Series) भारतीय ओपनर केएल राहुलचा खराब खेळ सुरू आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs England T20 Series) भारतीय ओपनर केएल राहुलचा खराब खेळ सुरू आहे.

मुंबई, 17 मार्च : इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs England T20 Series) भारतीय ओपनर केएल राहुलचा खराब खेळ सुरू आहे. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) झालेल्या मॅचमध्ये राहुल शून्यावर आऊट झाला. राहुल या मालिकेत सलग दोनदा, तर मागच्या चार मॅचमध्ये तिसऱ्यांदा शून्यावर आऊट झाला आहे.

राहुलनं सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) जागेवर टीममध्ये आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharama) सोबत डावाची सुरुवात केली. मात्र तो फक्त चार बॉलच मैदानावर टिकला. इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वुडने (Mark Wood) त्याला बोल्ड केलं. राहुल या मालिकेत  दोनदा बोल्ड झाला आहे. त्यावरुन तो फॉर्मात नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

राहुल शून्यावर आऊट होताच ट्विटरवर क्रिकेट फॅन्सनी टीम मॅनेजमेंटला प्रश्न विचारले आहेत. 'राहुलला उर्वरित सामन्यांसाठी आराम द्यायला हवा, कारण तो अजिबात फॉर्ममध्ये नाही. राहुलच्या जागेवर सूर्यकुमारला संधी मिळायला हवी.' अशी मागणी एका युजरने केली आहे. तर अन्य एका युजरने 'बॅटींगमध्ये सातत्य दाखवणारा राहुल हा एकमेव खेळाडू आहे' अशी उपहासात्मक टीका केली आहे. तर राहुलला कोणत्या आधारावर अंतिम 11 मध्ये संधी दिली जात आहे? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.

(वाचा - Coronavirus : क्रिकेटला पुन्हा फटका, मोठी स्पर्धा स्थगित करण्याचा BCCI चा निर्णय)

केएल राहुलने 47 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 40.61 च्या सरासरीने आणि 143.14 च्या स्ट्राईक रेटने 1,078 रन केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. सीरिजच्या सुरूवातीलाच कर्णधार विराट कोहली याने केएल राहुल आणि रोहित शर्मा हे आमचे ओपनर असतील, तसंच शिखर धवन तिसरा ओपनर म्हणून पर्याय असेल, असं स्पष्ट केलं होतं. रोहित शर्माला विश्रांती दिली तेव्हा पहिल्या मॅचमध्ये शिखर धवन आणि केएल राहुल, तर दुसऱ्या मॅचमध्ये इशान किशन आणि केएल राहुल ओपनिंगला खेळले होते.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Narendra modi stadium, Rohit sharma, Sports