मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Coronavirus : क्रिकेटला पुन्हा फटका, मोठी स्पर्धा स्थगित करण्याचा BCCI चा निर्णय

Coronavirus : क्रिकेटला पुन्हा फटका, मोठी स्पर्धा स्थगित करण्याचा BCCI चा निर्णय

 देशातील वाढत्या कोरोना व्हायरस रुग्णांचा (Coronavirus in India) फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे.  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने सर्व वयोगटांमधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील वाढत्या कोरोना व्हायरस रुग्णांचा (Coronavirus in India) फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने सर्व वयोगटांमधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील वाढत्या कोरोना व्हायरस रुग्णांचा (Coronavirus in India) फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने सर्व वयोगटांमधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 17 मार्च :  देशातील वाढत्या कोरोना व्हायरस रुग्णांचा (Coronavirus in India) फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे.  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने सर्व वयोगटांमधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मे -जून महिन्यात होणारी 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड स्पर्धेचा (Vinoo Mankad Tournament) समावेश आहे. आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर या स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्पष्ट केले आहे.

'विनू मंकड स्पर्धेच्या दरम्यान अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू या परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा खेळवणे योग्य नाही,' असे शाह यांनी सांगितले. याबाबत शहा यांनी सर्व क्रिकेट बोर्डाला पत्र देखील लिहिले आहे. या विषयावर ANI ने दिलेल्या वृत्तानुसार 'सध्याच्या परिस्थितीमध्ये या स्पर्धा झाल्या तर खेळाडूंना एका शहरामधून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर क्वारंटाईनचे नियमांचे पालन करण्यासाठी बायो बबलमध्ये रहावे लागेल. जे सध्या ठीक नाही.'

'खेळाडूंची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य'

शहा यांनी या पत्रात लिहिले आहे की, 'आमच्यासाठी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आयपीएल स्पर्धेनंतर या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा विचार करण्यात येईल.' आयपीएल स्पर्धेचा 14 वा सीझन 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान होणार आहे.

कोरोना व्हायरसनंतर यावर्षी सय्यद मुश्ताक अली टी20 आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन देशांतर्गत स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धा निवडक शहरांमध्ये पार पडल्या. यासाठी खास बायो बबल तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्याबरोबरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही सुरुवात झाली आहे.

(हे वाचा IND vs ENG : 'टी-20 सीरिज रद्द केली नाही तर जाळून घेऊ,' पोलिसांना फोन करून धमकी )

भारत-इंग्लंड यांच्यातील चार टेस्ट मॅचची मालिका पार पडली असून सध्या टी20 मालिका सुरु आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची वन-डे टीम देखील सध्या भारतामध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला टीममधील वन-डे मालिका सध्या लखनऊमध्ये सुरु असून त्यानंतर टी20 मालिका देखील लखनऊमध्ये होणार आहे.

First published:

Tags: BCCI, Coronavirus, Cricket, Cricket news