Home /News /sport /

टीम इंडिया इंग्लंडनंतर करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक

टीम इंडिया इंग्लंडनंतर करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर टीम इंडियाचं वेळापत्रक भरगच्च आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा दौरा करणार आहे.

    मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर टीम इंडियाचं वेळापत्रक भरगच्च आहे. आयपीएलनंतर लगेच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेशी सामना करायचा आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. इंग्लंड दौऱ्यात मागील वर्षी राहिलेली एक टेस्ट खेळवली जाईल. तसंच काही लिमिटेड ओव्हर्सचे सामनेही होतील. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया थेट वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. 'क्रिकबझ' नं दिलेल्या रिपोर्टनुसार वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय टीम तीन वन-डे आणि पाच टी20 इंटरनॅशनलचे सामने खेळणार आहे. पाच टी20 इंटरनॅशनलपैकी एक किंवा दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडीमध्ये खेळले जाणार आहेत. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे सीरिज क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळली जाईल. 22.24 आणि 27 जुलै रोजी हे सामने होतील. अमेरिकेतही सामने या रिपोर्टनुसार पहिला टी20 इंटरनॅशनल सामना 29 जुलै रोजी ब्रायल लारा स्टेडिअमवर होईल. त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी सेंट किट्स अँड नोव्हिस पार्कमध्ये दुसरा आणि तिसरा टी20 सामना खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय टीम 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये या सीरिजमधील शेवटचे दोन सामने खेळेल. टीम इंडियानं यापूर्वी दोनदा वेस्ट इंडिज दौऱ्यात फ्लोरिडामध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सर्वप्रथम 2016 साली अमेरिकेतील या शहरानं 2 टी20 इंटरनॅशनल सामन्यांचं यजमानपद भूषवलं होतं. त्यानंतर 2019 साली तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने फ्लोरिडामध्ये खेळवण्यात आले होते. या मालिकेत वेस्ट इंडिज टीमचे नेतृत्त्व निकोलस पूरन करणार आहे. कायरन पोलार्डनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. IPL 2022 : महिनाभरापूर्वीचा व्हिलन बनला हिरो, मुंबईला मिळवून दिला थरारक विजय इंग्लंड-आयर्लंड दौरा टीम इंडियाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा जूम महिन्यात सुरू होईल. भारतीय टीम या दौऱ्याच्या सुरूवातीला आयर्लंड विरूद्ध दोन टी20 इंटरनॅशनल सामने खेळेल. 26 जून रोजी या मालिकेची सुरूवात होईल. त्यानंतर इंग्लंड विरूद्ध पाच टेस्टच्या सीरिजमधील शेवटची टेस्ट मॅच खेळवली जाईल. कोरोनामुळे मागील वर्षी ही टेस्ट रद्द करण्यात आली होती. या टेस्टनंतर 3 सामन्यांची टी20 आणि तितक्याच सामन्यांची वन-डे सीरिज खेळवली जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india, West indies

    पुढील बातम्या