मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कॅप्टन, मुंबईच्या दमदार खेळाडूचं टेस्ट टीममध्ये पदार्पण

IND vs NZ : अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कॅप्टन, मुंबईच्या दमदार खेळाडूचं टेस्ट टीममध्ये पदार्पण

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टसाठी (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टसाठी (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टसाठी (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टसाठी (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. कानपूरमध्ये होणाऱ्या या टेस्टसाठी विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. तर रोहित शर्मा संपूर्ण टेस्ट सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा कॅप्टन असेल.

अजिंक्यनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी विराट कोहली उपलब्ध असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अय्यर 2017 पासून मर्यादीत ओव्हर्समधील टीम इंडियाचा सदस्य आहे. त्याची पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली आहे. विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीमध्ये तो कानपूर टेस्टमध्ये खेळेल असा अंदाज आहे.

ऋषभ पंतला विश्रांती

टीम इंडियाचा मुख्य विकेट किपर ऋषभ पंतला (Rishabh Pant) अपेक्षेप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या जागी वृद्धीमान साहा विकेट किपर असेल.या टीममध्ये तब्बल 5 वर्षांनी जयंत यादवचं (Jayant Yadav) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जयंत यादवनं 2016 साली इंग्लंड विरुद्ध शेवटची टेस्ट खेळली होती.

काय! विराट कोहली 'या' प्रकारातून निवृत्त होणार....वाचा का सुरू झाली चर्चा

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला देखील आगामी दक्षिण आफ्रिका सीरिजचा विचार करत  विश्रांती देण्यात आली आहे. उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णावर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. तर आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि जयंत यादव हे चार स्पिनर टीम इंडियात आहेत.

भारत-न्यूझीलंड टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

टीप: विराट कोहलीला कानपूर टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली असून तो मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियात सहभागी होईल

First published:
top videos

    Tags: Ajinkya rahane, Shreyas iyer, Team india