• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • काय! विराट कोहली 'या' प्रकारातून निवृत्त होणार....वाचा का सुरू झाली चर्चा

काय! विराट कोहली 'या' प्रकारातून निवृत्त होणार....वाचा का सुरू झाली चर्चा

विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) टी20 इंटरनॅशनल टीमची कॅप्टनसी सोडली आहे. त्यानंतर आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन करण्यात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 नोव्हेंबर: विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) टी20 इंटरनॅशनल टीमची कॅप्टनसी सोडली आहे. त्यानंतर आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन करण्यात आलं असून विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटनं हा निर्णय टीम इंडियातील गटबाजीमुळे घेतला असल्याचा दावा काही क्रिकेटपटूंनी केला आहे. त्याचबरोबर तो लवकरच T20 क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. का सुरू झाली चर्चा? पाकिस्तानचा कोच मुश्ताक अहमदनं (Mushtaq Ahmed) विराटच्या कॅप्टनसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सर्व काही आलबेल नाही. त्याच कारणामुळे विराटनं T20 टीमची कॅप्टनसी सोडली आहे. इतकच नाही तर विराट लवकरच T20 क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असा दावा मुश्ताकनं केला. 'एखादा यशस्वी कॅप्टन कॅप्टनसी सोडत असेल तर ड्रेसिंग रूममध्ये सर्व गोष्टी चांगल्या नाहीत. सध्या भारतीय टीमची विभागणी दिल्ली आणि मुंबई या दोन ग्रुपमध्ये झाली आहे,' असा आरोपही मुश्ताकनं केला. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनंही टीम इंडियात गटबाजी असल्याचा आरोप केला आहे. याच कारणामुळे टीम इंडियाची कामगिरी प्रभावित झाली, असा दावा अख्तरनं केला. टी20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर सध्या टीका होत आहे. मात्र त्याचवेळी माजी क्रिकेटपटूंनी पाठिंबा दिला आहे. विराटनं वन-डे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन राहावं असं मत वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं आहे. सेहवागनं विराटची पाठराखण केली असली तरी विराट टी20 प्रकारातील कॅप्टनसी सोडणार असल्याचं वृत्त यापूर्वी देखील प्रसिद्ध झालं होतं. पाकिस्तानच्या मॅचमध्ये सानिया मिर्झावर निघाला फॅन्सचा राग, वाचा काय आहे प्रकरण विराटनं वर्कलोडचं कारण देत या टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट 2016 पासून टीम इंडियाची सर्व फॉर्मेटमध्ये कॅप्टनसी करत आहे. तर 2013 पासून आरसीबीचा कॅप्टन आहे.  विराट आता 33 वर्षांचा असून त्याचा फिटनेस पाहता तो आणखी 4 ते 5 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. पण, त्याचवेळी आपलं करिअर अधिक काळ राहावं यासाठी तो एक प्रकार सोडून देण्याची शक्यता आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण हे दिग्गज क्रिकेटपटू त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात फक्त टेस्ट क्रिकेट खेळत होते. विराटही त्यांचं अनुकरण करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published: