कोहलीने अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी एका महिला क्रिकेटपटूला प्रपोज केलं होतं. ही आहे इंग्लंडची सारा टेलर. कोहलीला आणि तिला अनेक वेळा एकत्र बघितलं गेलं होतं.
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खूप सुंदर मानली जाते. दोघांमध्ये दृढ नातं आहे . कोहलीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अगदी महिला क्रिकेटपटूंमध्येही त्याची क्रेझ आहे.
सारा टेलरने कोहलीला लग्नासाठी थेट ट्विट करून प्रपोज केलं होते. परंतु हे नातं फार पुढे जाऊ शकलं नाही.
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने ट्विटरवर पाच वर्षांपूर्वी काही जुने फोटो शेअर केले होते. त्यात कॅप्शनमध्ये 'जेव्हा विराट कोहलीला साराला भेटायचे होतं', असं लिहिलं आहे.
याला उत्तर देताना सारा टेलरनेही दुजोरा देत म्हटलं होतं की, 'विलक्षण दिवस होता. पहाटे कॉल आणि सकाळी 5 वाजता नाश्ता. हे सगळं माझ्यासाठी वेगळं होतं.'