मुंबई, 29 सप्टेंबर : यूएईमध्ये सध्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा (IPL 2021) ही पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) रंगीत तालिम मानली जात आहे. या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या कामगिरीकडं निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटचं बारीक लक्ष आहे. आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या मॅचनंतर वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) बदल होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय केला होता बदल?
टीम इंडियामध्ये सर्वाधिक 6 खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) आहेत. मुंबई इंडियन्ससाठी युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेची सुरूवात निराशाजनक झाली होती. रोहित शर्माच्या टीमला पहिल्या 3 मॅचमध्ये पराभव स्विकारावा लागला. मंगळवारी, पंजाब किंग्जचा पराभव करत (MI vs PBKS) मुंबईनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या टीममध्ये 2 बदल केले होते. विकेट किपर बॅट्समन इशान किशनच्या (Ishan Kishan) जागी सौरभ तिवारी आणि अॅडम मिल्नेच्या जागी नॅथन कुल्टर नाईलचा टीममध्ये समावेश केला. ‘टीममध्ये बदल करण्याचा निर्णय अवघड होता. आम्ही काही चुका केल्या आता स्पर्धेत कमबॅक करण्याची आमची इच्छा आहे,’ असं मत रोहित शर्मानं टॉसनंतर व्यक्त केलं होतं.
मुंबई इंडियन्सनं पराभवाची मालिका तोडली, Points Table मध्ये मोठा बदल
मुंबई इंडियन्सनं इशान किशनला वगळल्यानं त्याची टी20 वर्ल्ड कप टीममधी जागा धोक्यात आली आहे, असं मानलं जात आहे. बीसीसीआय या टीममध्ये बदल करु शकते असं वृत्त काही माध्यमांनी दिली आहे. टीममध्ये बदल झाले तर इशान किशनला त्याचा फटका बसू शकतो.
इशान किशनची या आयपीएल सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. यूएईमध्ये झालेल्या पहिल्या तीन मॅचमध्ये त्यानं फक्त 34 रन काढले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये त्यानं एकूण 8 मॅचमध्ये 13 च्या सरासरीनं फक्त 107 रन काढले आहेत. 28 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर असून त्याचा स्ट्राईक रेट 87 आहे. इशानप्रमाणेच मुंबईचा अन्य एक बॅट्समन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) टीम इंडियातील जागेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेला सूर्या पंजाब विरुद्ध तर शून्यावर आऊट झाला.
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ishan kishan, Mumbai Indians, T20 world cup