मुंबई, 6 डिसेंबर : न्यूझीलंडकडून या वर्षात सहन कराव्या लागल्या सर्व मानहानीचा बदला अखेर टीम इंडियानं घेतला आहे. मुंबईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) भारतीय टीमनं 372 रननं दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर टीम इंडियानं हा बदला पूर्ण केला. यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले होते. त्यानंतर कानपूरमध्ये हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेत ती टेस्ट ड्रॉ केली होती. कानपूरनंतर मुंबईत झालेल्या दुसऱ्या आणि सीरिजमधील शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियानं चौथ्या दिवशीच विजय मिळवत ही सीरिज 1-0 नं जिंकली आहे. भारतीय टीमनं ही सीरिज जिंकताच आयसीसी वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्येही (ICC World Test Ranking) टीम इंडियाचा फायदा झाला असून आता भारतीय टीमनं नंबर 1 वर उडी मारली आहे. या सीरिजच्या सुरुवातीला न्यूझीलंडची टीम 126 रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर होती. तर टीम इंडियाकडे 119 पॉईंट्स होते. कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानं न्यूझीलंडला सीरिजमध्ये फायदा झाला. पण, त्यांचे रेटींग पॉईंट्समध्ये नुकसान झाले. त्यानंतर मुंबई टेस्टमध्ये झालेल्या मोठ्या पराभवाने त्यांनी नंबर 1 देखील गमावला आहे. टीम इंडिया नंबर 1 झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप आयसीसीनं केलेली नाही. आयसीसीच्या वतीने दर बुधवारी आठवड्याची ताजी रँकिंग जाहीर केली जाते.
#TeamIndia win the 2nd Test by 372 runs to clinch the series 1-0.
— BCCI (@BCCI) December 6, 2021
Scorecard - https://t.co/KYV5Z1jAEM #INDvNZ @Paytm pic.twitter.com/uCdBEH4M6h
मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाच्या 325 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची पहिली इनिंग फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. कोणत्याही टीमचा टेस्ट क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रनवर इनिंग घोषित केली. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला स्थिराऊ दिले नाही. पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढणाऱ्या मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) देखील टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. IND vs NZ: 4 वर्षानंतर टीम इंडियात परलेल्या ‘मुंबईकरा’ची कमाल, टीम इंडियाचा दणदणीत विजय मयांक अग्रवालला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारनं गौरवण्यात आले. तर या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेणारा अश्विन ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरला.