Home /News /sport /

IND vs NZ: 4 वर्षानंतर टीम इंडियात परतलेल्या 'मुंबईकरा'ची कमाल, टीम इंडियाचा दणदणीत विजय

IND vs NZ: 4 वर्षानंतर टीम इंडियात परतलेल्या 'मुंबईकरा'ची कमाल, टीम इंडियाचा दणदणीत विजय

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियात 4 वर्षांनी परतलेला 'मुंबईकर' चौथ्या दिवसाच्या विजयाचा हिरो ठरला.

    मुंबई, 6 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया विजयापासून 5 विकेट्स दूर होती. टीम इंडियानं या 5 विकेट्स फक्त 45 मिनिटांमध्ये मिळवत न्यूझीलंडचा 372 रनने मोठा पराभव केला. टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 540 रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 167 रनवर ऑल आऊट झाली. टीम इंडियात 4 वर्षांनी परतलेला मुंबई इंडियन्सचा स्पिनर जयंत यादव (Jayant Yadav) चौथ्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं झटपट विकेट्स घेत भारतीय टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबरच टीम इंडियाने ही टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये  आर. अश्विन आणि  जयंत यादवने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. जयंत यादवने सोमवारी सकाळी झटपट 3 विकेट्स घेत न्यूझीलंडचा पराभव जवळ आणला. न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं या टेस्टमधील एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पण या कामगिरीनंतरही न्यूझीलंडची नामुश्की त्याला टाळता आली नाही. एजाजने पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या. मुंबई टेस्टमध्ये विक्रमी 14 विकेट्स घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंनी साथ दिली नाही. खराब अंपायरिंगवर विराट कोहली संतापला, भर मैदानात म्हणाला...VIDEO टीम इंडियाच्या 325 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची पहिली इनिंग फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. कोणत्याही टीमचा टेस्ट क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रनवर इनिंग घोषित केली. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला स्थिराऊ दिले नाही.  पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढणाऱ्या मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) देखील टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या