मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup Final: इंग्लंडला हरवणाऱ्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला...

T20 World Cup Final: इंग्लंडला हरवणाऱ्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला...

T20 वर्ल्ड कपच्या फायनलचे (T20 World Cup 2021 Final) आता क्रिकेट विश्वाला वेध लागले आहेत. या फायनलपूर्वी इंग्लंडला पराभूत करणाऱ्या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूनं ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13  नोव्हेंबर: T20 वर्ल्ड कपच्या फायनलचे (T20 World Cup 2021 Final) आता क्रिकेट विश्वाला वेध लागले आहेत. पात्रता फेरी, सुपर 12 आणि दोन सेमी फायनल या सर्वानंतर या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन टीम निश्चित झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात रविवारी दुबईमध्ये फायनल मॅच होणार आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही टीमला आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या फायनलनंतर टी20 विश्वाला नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्या सेमी फायनलमध्ये ऑल राऊंडर जिमी नीशमचा (Jimmy Neesham) न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. नीशमनं निर्णायक क्षणी 11 बॉलमध्ये 27 रनची खेळी करत मॅचचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकवलं होतं. आता फायनल मॅचपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलिया टीमला इशारा दिला आहे.

न्यूझीलंडनं सेमी फायनलची मॅच जिंकल्यानंतर नीशमनं कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. त्यावर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला की, 'माझ्या मते तुम्ही फक्त सेमी फायनल जिंकण्यासाठी अर्ध जग पालथं घालत नाही. आमचं लक्ष फायनलवर आहे. मी स्वत: आणि आमची टीम सध्या फार विचार करत नाही. पण, फायनल मॅच जिंकलो तर आमच्या भावनांचं उघड प्रदर्शन करू', असं नीशमनं सांगितलं.

का केलं नाही सेलिब्रेशन?

इंग्लंडनं दिलेलं 167 रनचं आव्हान न्यूझीलंडनं 6 बॉल आणि 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. डॅरेल मिचेलनं (Darell Mitchell) 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी न्यूझीलंडच्या संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. काही खेळाडूंनी उडी मारत आनंद व्यक्त केला. तर काही जण एकमेकांची गळाभेट घेत होते.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू व्हॅक्सिन घेण्यास तयार नाही, स्पर्धेतून झाला बाहेर!

न्यूझीलंडच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण असताना त्यांचा ऑल राऊंडर जेम्स नीशम (James Neesham) खूर्चीवर शांत बसला होता. त्याचा चेहरा स्थिर होता. त्यावरील हावभाव बदलले नाहीत. तसंच त्यानं कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. नीशमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नाीशमनं या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजूनही काम पूर्ण झालेलं नाही, असं ट्विट नीशमनं केलं आहे.

First published:

Tags: Australia, New zealand, T20 world cup