मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाचा क्रिकेटपटू व्हॅक्सिन घेण्यास तयार नाही, स्पर्धेतून झाला बाहेर!

टीम इंडियाचा क्रिकेटपटू व्हॅक्सिन घेण्यास तयार नाही, स्पर्धेतून झाला बाहेर!

कोरोना व्हायरसवर (Corona virus) मात करण्यासाठी सध्या  जगभर लसीकरण सुरू आहे. टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू अजूनही लस घेण्यास तयार नाही.

कोरोना व्हायरसवर (Corona virus) मात करण्यासाठी सध्या जगभर लसीकरण सुरू आहे. टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू अजूनही लस घेण्यास तयार नाही.

कोरोना व्हायरसवर (Corona virus) मात करण्यासाठी सध्या जगभर लसीकरण सुरू आहे. टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू अजूनही लस घेण्यास तयार नाही.

मुंबई, 13 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसवर (Corona virus) मात करण्यासाठी सध्या  जगभर लसीकरण सुरू आहे. 100 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालेला भारत हा पहिला देश बनला आहे. लसीकरणाबाबत मोठ्या पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. त्यामध्ये सरकार आणि स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार आहे. तसंच सेलिब्रेटी मंडळी देखील लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन सर्वांना करत आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही काही जण अजूनही लस घेण्यास तयार नाहीत. लस घेण्यास तयार नसलेल्या व्यक्तींमध्ये टीम इंडियाचा क्रिकेटपटू मुरली विजय (Murali Vijay) याचा समावेश आहे.

तामिळनाडूनं या महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी  (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेपासून नव्या सिझनला सुरूवात केली. पण या टीमचा स्टार खेळाडू आणि टीम इंडिया बॅटर मुरली विजय (Murali Vijay) कोरोना व्हॅक्सिन (Covid-19 vaccine) घेण्यास किंवा बायो-बबलमध्ये राहण्यास तयार नाही. त्यामुळे तो या स्पर्धेत खेळला नाही. बीसीसीआयनं सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना कोरोना प्रोटोकॉलचं पालन काटेकोरपणे करण्याची सूचना केली आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'तील वृत्तानुसार विजय बायो-बबलमध्ये दाखल होण्यास तयार नव्हता. नव्या नियमानुसार क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश करणे बंधनकारक आहे. पण, विजय यासाठी तयार नव्हता. त्यामुळे निवड समितीनं त्याचा टीममध्ये समावेश केला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू निवड समितीच्या बैठकीत 37 वर्षांच्या मुरली विजयच्या नावावर चर्चाच झाली नाही. विजय व्हॅक्सिन घेण्यास तयार झाला तरी त्याला आधी फिटनेस सिद्ध करावा लागेल. त्यानंतरच त्याची टीममध्ये निवड होईल. देशांतर्गत स्पर्धेसाठी तामिळनाडूच्या संभाव्य टीममध्येही विजयचं नाव नव्हतं. त्याला टीममध्ये पुनरागन करण्यापूर्वी फिटनेस सिद्ध करावा लागेल, तसंच काही सामने खेळावे लागतील.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज होणार की नाही? ICC दिलं मोठं अपडेट

मुरली विजय या आयपीएल सिझनमध्ये कोणत्याही टीमचा सदस्य नव्हता. तो 2019 साला तामिळनाडूकडून कर्नाटक विरुद्ध शेवटची रणजी मॅच खेळला आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Cricket news, Tamil nadu