• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup, NZ vs AFG: 'भाई काळजी करू नकोस', निर्णायक मॅचपूर्वी राशिद खाननं दिला अश्विनला दिलासा

T20 World Cup, NZ vs AFG: 'भाई काळजी करू नकोस', निर्णायक मॅचपूर्वी राशिद खाननं दिला अश्विनला दिलासा

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही मॅच होणार आहे. या मॅचच्या निकालावरच टीम इंडियाचं या स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही मॅच होणार आहे. या मॅचच्या निकालावरच टीम इंडियाचं या स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे. ही मॅच न्यूझीलंडनं जिंकली तर भारतीय टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण, अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केलं तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी असेल. या निर्णायक मॅचपूर्वी आर. अश्विन (R. Ashwin) आणि राशिद खान (Rashid Khan) यांच्यातील संभाषण सध्या व्हायरल झालं आहे. अफगाणिस्तानच्या मॅचपूर्वी अश्विननं अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली होती. अफगाणिस्तान टीमला शुभेच्छा. मुजीब न्यूझीलंड विरुद्ध खेळणार असेल तर आम्ही त्यांना फिजियोचा सपोर्ट देण्यासाठी देखील तयार आहोत.' असं अश्विननं स्पष्ट केलं. अफगाणिस्तानचा प्रमुख स्पिनर मुजीब उर रहमान दुखापतीमुळे दोन मॅच खेळू शकला नव्हता. तो बरा होण्यासाठी मदत करायला तयार असल्याची मजेशीर ऑफर अश्विननं दिली होती. अश्निनच्या या मजेशीर प्रस्तावाला राशिद खाननं उत्तर दिलं आहे. 'भाई, टेन्शन घेऊ नकोस आमच्या टीमचे फिजिओ प्रशांत पंचाडा पाहात आहे.' असं राशिदनं उत्तर दिलं असून ते व्हायरल झालं आहे. टीम इंडियासाठी Good News अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याआधी टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे. मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rehman)  पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी तो फिट झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध मुजीबने 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या. दुखापतीमुळे मुजीब फक्त दोनच मॅच खेळू शकला होता. शनिवारी मुजीबने जिममध्ये व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवरून मुजीब न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी फिट झाल्याचं मानलं जात आहे. सेमी फायनलमध्ये जाताच इंग्लंडला धक्का, प्रमुख खेळाडू आऊट! भारताला होणार फायदा अफगाणिस्तानच्या टीमने युएईमध्ये न्यूझीलंडपेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. तसंच अफगाणिस्तानचं युएईमधलं रेकॉर्ड न्यूझीलंडपेक्षाही चांगलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान न्यूझीलंडला कडवी झुंज देईल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानकडे मुजीबशिवाय राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासारखे उत्कृष्ट स्पिन बॉलर आहेत. राशिदने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 5.93 च्या इकोनॉमी रेटने 7 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: