• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 WC: सेमी फायनलमध्ये जाताच इंग्लंडला धक्का, प्रमुख खेळाडू आऊट! भारताला होणार फायदा

T20 WC: सेमी फायनलमध्ये जाताच इंग्लंडला धक्का, प्रमुख खेळाडू आऊट! भारताला होणार फायदा

ग्रुप 1 मधून अव्वल क्रमांकासह सेमी फायनलमध्ये गेलेल्या इंग्लंडला (England Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. त्याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर:  इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर (England vs South Africa) सरस रन रेटच्या जोरावर सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. ग्रुप 1 मधून अव्वल क्रमांकासह सेमी फायनलमध्ये गेलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. कारण, टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर त्याची लढत इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय (Jason Roy) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मॅचमध्ये जखमी झाला. आफ्रिकेविरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयनं 20 रन काढले होते. त्यानंतर एक रन काढताना त्याचा पाय दुखावला. त्यामुळे त्याला रिटायर हर्ट व्हावं लागलं. रॉयच्या दुखापतीचं अपडेट रविवारीच समजेल, अशी माहिती इंग्लंडचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) यानं दिली आहे. जेसन रॉय हा टी20 क्रिकेटमधील उपयुक्त खेळाडू आहे. त्यानं एकूण 262 टी20 मध्ये 28 च्या सरासरीनं 6842 रन काढले असून त्याचा स्ट्राईक रेट 143 आहे. यामध्ये त्यानं 4 शतक आणि 46 अर्धशतक झळकावली आहेत. याचा अर्थ त्यानं 50 वेळा 50 पेक्षा जास्त रन काढले आहेत. इंग्लंडनं 2019 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदात रॉयची भूमिका महत्त्वाची होती. त्यानं 8 मॅचमध्ये 63 च्या सरासरीनं 443 रन काढले होते. यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकाचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 115 चा होता. त्यानं वर्ल्ड कपमध्ये 153 रनची मोठी खेळी केली होती. तसंच सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 85 रनची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला होता. T20 World Cup : रबाडाची हॅट्रिक, इंग्लंडचा पहिला पराभव, तरी दक्षिण आफ्रिका आऊट! इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गन या दुखापतीमुळे फारसा चिंतीत नाही. तो मॅच संपल्यानंतर म्हणाला की, 'ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेन स्टोक्स, सॅम करन आणि जोफ्रा आर्चर आमच्या टीममधून आऊट झाले. तरीही नवे प्रतिभावंतर खेळाडू समोर आले आहेत. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आमही एक कोअर ग्रुप बनवला आहे. त्याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रुपमध्ये अव्वल क्रमांक पटकावल्यानं मी खूश आहे. यासाठी आम्ही किती मेहनत घेतली हे आम्हाला माहिती आहे.' असं मॉर्गननं स्पष्ट केलं.
  Published by:News18 Desk
  First published: