जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 WC : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? वाचा सेमी फायनलमध्ये रोहित कुणाला देणार संधी

T20 WC : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? वाचा सेमी फायनलमध्ये रोहित कुणाला देणार संधी

T20 WC : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? वाचा सेमी फायनलमध्ये रोहित कुणाला देणार संधी

T20 WC : इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सेमी फायनलमध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी कुणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 9 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत टीम इंडियाची कामगिरी दमदार झाली आहे. भारतीय टीम सध्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. भारतीय फॅन्सचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता फक्त 2 सामन्यांचा अडथळा आहे. टीम इंडियासमोर गुरुवारी होणाऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान आहे.  इंग्लंडविरुद्धच्या या सेमी फायनलमधील प्लेईंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत व दिनेश कार्तिक यापैकी कोणाला स्थान दिलं जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. भारतीय टीमनं टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली असून, तिथे त्यांची लढत इंग्लंडशी होणार आहे. दरम्यान, या मॅचच्या प्लेइंग-इलेव्हनबद्दल चर्चा रंगू लागली आहे. विशेषत: भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा हा ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांपैकी नेमकं कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतो, याकडे लक्ष लागलं आहे. कार्तिकचा कसून सराव मंगळवारी (8 नोव्हेंबर 2022) दिनेश कार्तिक नेटमध्ये बराच वेळ बॅटिंग करताना दिसला. मात्र, सेमी फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिकऐवजी ऋषभ पंत फेव्हरेट असल्याचं दिसतं आहे. या मॅचमध्ये पंतला प्राधान्य दिल्यास हार्दिक पंड्याला फिनिशरची विशेष भूमिका बजावावी लागेल. पंड्यानं पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-12 फेरीच्या मॅचमध्ये 40 रन करीत 3 विकेटही घेतल्या होत्या. तर, झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये पंड्यानं 3 ओव्हरमध्ये 16 रन देऊन दोन विकेट घेतल्या होत्या. मैदानात चाहत्यांनी उर्वशीच्या नावानं चिडवलं; ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा Video का आहे पंतवर विश्वास? टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मॅचमध्ये ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा किमान एका मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करणार नसल्याचं मानलं जात आहे. पंत या स्पर्धेतील पहिली मॅच मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला. या मॅचमध्ये त्याला केवळ 3 रन करता आल्या. तरीही, पंत फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकपेक्षा सरस आहे. त्यामुळे सेमी फायनलच्या मॅचसाठी पंतची निवड निश्चित मानली जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात