जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मैदानात चाहत्यांनी उर्वशीच्या नावानं चिडवलं; ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा Video

मैदानात चाहत्यांनी उर्वशीच्या नावानं चिडवलं; ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा Video

मैदानात चाहत्यांनी उर्वशीच्या नावानं चिडवलं; ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा Video

मैदानात चाहत्यांनी उर्वशीच्या नावानं चिडवलं; ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा Video

क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवलंही जातंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 8 नोव्हेंबर:  क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवलंही जातंय. सध्या ऋषभ भारतासाठी ऑस्ट्रेलियात सुरू असलेला 20-20 वर्ल्ड कप खेळतोय; पण तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पंत पुन्हा एकदा चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. कारण त्याने झिम्बाब्वेविरुद्ध पाच बॉल्समध्ये केवळ तीन रन्स काढले. दरम्यान, आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऋषभ पंत नाराज असल्याचं दिसून आलं. स्टेडिअममध्ये जमलेले प्रेक्षक त्याला उर्वशी रौतेलाच्या नावाने चिडवत होते. त्यात पंतने दिलेलं उत्तर सध्या व्हायरल होतंय. व्हिडिओमध्ये असं दिसतंय, की ऋषभ पंत एका सामन्यादरम्यान ड्रिंक्स आणि टॉवेल घेऊन जात आहे. बाँड्रीलाइनवरून तो जात होता. तेवढ्यातच गर्दीतून एक चाहता ओरडला : “भाई, भाई, उर्वशी बुला रही है.” ते ऐकून ऋषभ नाराज झाल्याचं दिसलं आणि त्याने ‘जाके ले ले फिर’ असं उत्तर दिलं. चाहत्यांच्या या कृत्यामुळे ऋषभ वैतागल्याचं दिसत होतं. त्याने दिलेलं उत्तर हा चर्चेचा विषय ठरलाय. हेही वाचा:  T20 World Cup: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंकडून फास्ट बॉलर्सना अशी वागणूक, पाहा फ्लाईटमध्ये काय घडलं? दरम्यान, ऋषभच्या अलीकडच्या फॉर्मबद्दल बोलायचं झाल्यास तो या वर्ल्ड कपमध्ये फक्त एक मॅच खेळला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तो पाच बॉल्समध्ये केवळ तीन रन्स करू शकला. गेल्या काही महिन्यांत तो बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतच्या वादामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातला वाद सर्वज्ञात आहे. त्या दोघांदरम्यान रंगलेल्या इन्स्टा वॉरवरून सर्वांना त्यांच्यातल्या वादाची माहिती झाली. उर्वशीने एका मुलाखतीत ऋषभ पंतबद्दल अप्रत्यक्षरीत्या भाष्य केलं होतं. त्या वेळी तिने आरपी नावाचा एक जण दिल्लीत तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना भेटायला आला होता, असं सांगितलं होतं.

    जाहिरात

    आरपी म्हटल्यानंतर तो ऋषभ पंत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. यानंतर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळालं. या प्रकरणानंतर उर्वशीने ऋषभची माफीही मागितली होती. नंतर ती ऋषभ वर्ल्ड कपची तयारी करत असताना ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यानंतर ती ऋषभला भेटायला गेल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं; मात्र भारतीय प्रसारमाध्यमं तिच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवत असल्याची टीका तिने केली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात