जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 WC : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहितला पार करावं लागेल 'हे' आव्हान

T20 WC : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहितला पार करावं लागेल 'हे' आव्हान

T20 WC : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहितला पार करावं लागेल 'हे' आव्हान

2007मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळालेलं नाही. त्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांना रोहितच्या टीमकडून मोठ्या आशा आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 13 ऑक्टोबर :  आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता काही दिवसांवर आली आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत 16 देश सहभागी होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक सहभागी देशाने खेळाडूंची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले असून, प्रॅक्टिस मॅचेसना सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) आपल्या सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाने गेल्या काही काळापासून रोहितच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आहे. नुकतीच टीमने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन टी-20 सीरिज जिंकल्या आहेत. आता रोहित प्रथमच वर्ल्ड कपमध्ये टीमचं नेतृत्व करणार आहे. 2007मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळालेलं नाही. त्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांना रोहितच्या टीमकडून मोठ्या आशा आहेत. सध्याची भारतीय टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात असली तर काही गोष्टी टीम मॅनेजमेंटच्या चिंतेचा विषय ठरत आहेत. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॅप्टनच्या फॉर्मची चिंता खेळाडूंचं मनोधैर्य खचू न देता त्यांना सतत प्रोत्साहन देणारा खेळाडू हा उत्तम कॅप्टन असतो. रोहित शर्माने आतापर्यंत या आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे. तो वर्ल्ड कपमध्ये चांगल्या पद्धतीने टीमचं नेतृत्व करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. मात्र, त्याचा वैयक्तिक फॉर्म चिंताजनक बाब ठरू शकते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने आतापर्यंत 32च्या सरासरीनं रन केले आहेत. पण, शेवटच्या पाच टी-20 मॅचेसमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नाही. दोनदा तर तो शून्यावर आउट झाला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इलेव्हनविरुद्ध झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्येही तो तीन रन्स करून आउट झाला. ओपनिंगची जबाबदारी असलेल्या रोहितसाठी ही गोष्ट नक्कीच अनुकूल नाही. गांगुली ठरला राजकारणाचा बळी? ‘दादा’ला BCCI नेच नारळ दिल्याची चर्चा दुखापतींचा प्रश्न अनुभवी खेळाडूंच्या दुखापती, हा टीम इंडियाच्या डोकेदुखीचा आणखी एक मुद्दा आहे. जखमी खेळाडूंच्या जागी घेतलेल्या खेळाडूंकडे फारसा अनुभव नाही. ऑल राउंडर रवींद्र जडेजा आणि मुख्य फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहेत. बुमराहची दुखापत गंभीर आहे, तर जडेजावर शस्त्रक्रिया करावी लागली. या दोन अनुभवी खेळाडूंपाठोपाठ बॉलर दीपक चहरही जखमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगल्या बॉलिंग कॉम्बिनेशनची समस्या टीमपुढे आहे. डेथ ओव्हर्सची डोकेदुखी याशिवाय, डेथ ओव्हर्समध्ये अतिरिक्त रन्स थांबवण्याचा कोणताही फॉर्म्युला टीम इंडियाकडे नाही. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे ही समस्या जास्त वाढली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या फास्ट बॉलर्सना अनुकुल असतात. पण, भुवनेश्वर कुमार, अर्शदीपसिंग आणि मोहम्मद शमीची डेथ ओव्हर्समधील अलीकडील कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे हे तिघे डेथ ओव्हर्समध्ये रन्सवर कसं नियंत्रण ठेवतील हे पाहणं मनोरंजक असेल. एअरपोर्टवर शार्दूल ठाकूरचा पारा चढला… हरभजनची मध्यस्थी पण नेमका काय घडला ड्रामा? वर्ल्ड कपमधील टॉप-6 टीम्समध्ये जोस बटलर (इंग्लंड) व्यतिरिक्त, रोहित दुसरा असा कॅप्टन आहे ज्याला वर्ल्ड कपमध्ये टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. या सर्व अडचणींवर मात करून जर रोहित शर्मानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर कोणत्याही क्रिकेट फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा कॅप्टन ठरेल. यापूर्वी, कपिल देव यांनी 1983 मध्ये वन-डे, महेंद्रसिंग धोनीने 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये वन-डे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात