मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर युवराजचा निशाणा, विराट-अनुष्काचं Meme Share करत लगावला टोला

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर युवराजचा निशाणा, विराट-अनुष्काचं Meme Share करत लगावला टोला

पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये भारतीय मिडल ऑर्डर पुन्हा एका उघडी पडली. या अपयशावर टीम इंडियाला दोनदा वर्ल्ड कप जिंकून देणारा ऑल राऊंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) मीम (Meme) शेअर करत टोला लगावला आहे.

मुंबई, 14 नोव्हेंबर: टीम इंडियाचं टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 12 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमला सेमी फायनल गाठण्यात अपयश आलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये भारतीय मिडल ऑर्डर पुन्हा एका उघडी पडली. या अपयशावर टीम इंडियाला दोनदा वर्ल्ड कप जिंकून देणारा ऑल राऊंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) मीम (Meme) शेअर करत टोला लगावला आहे. युवराजच्या या मिममध्ये विराट कोहली  (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) असून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

युवराजनं इन्स्टाग्रामवर एक मीम शेअर केलं आहे. त्यामध्ये अनुष्का शर्मा म्हणत आहे की, विराट नक्कीच एखाद्या मुलीचा विचार करत आहे. तर विराट विचार करतोय की युवराज असता तर टीम इंडियाची मिडल ऑर्डर स्ट्राँग झाली असती.' युवीनं या मीमसोबत हसण्याची इमोजी पोस्ट केली असून त्याची ही इन्स्टाग्राम स्टोरी फॅन्सना चांगलीच आवडली आहे.

युवराजनं 2000 साली नैरोबीमध्ये झालेल्या आयसीसी नॉक आऊट स्पर्धेत पदार्पण केलं होतं. त्यानं 17 वर्ष टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. या कालावधीमध्ये त्यानं 40 टेस्ट, 304 वन-डे आणि 58 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या. यामध्ये 17 शतक आणि 71 अर्धशतकांसह 11 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. युवराजनं यामध्ये 148 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार, T20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूचा न्यूझीलंड टीममध्ये समावेश

युवराजनं टी20 वर्ल्ड कप 2007 आणि वन-डे वर्ल्ड कप 2011 चं विजेतेपद पटकावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवीनं पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला सलग 6 सिक्स लगावले होते. तर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 बॉलमध्ये 70 रनची आक्रमक खेळी केली होती. तो 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 'मॅन ऑफ द सीरिज' होता. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत 28 वर्षांनी विजेतेपद पटकावले होते.

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Team india, Virat kohli and anushka sharma, Yuvraj singh