मुंबई, 14 नोव्हेंबर : न्यूझीलंड क्रिकेट टीम सध्या टी20 वर्ल्ड कपची फायनलची (T20 World Cup) तयारी करत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडनं सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव केला. आता फायनलमध्ये त्यांची लढत ऑस्ट्रेलियाशी (Australia vs New Zealand) होणार आहे. ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत फायनल गाठली आहे. या वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडची टीम लगेच भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातील टीममध्ये त्यांनी एक बदल केला आहे.
न्यूझीलंडचा विकेट किपर बॅटर डेवॉन कॉनवे (Devon Conway) इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये जखमी झाला. कॉनवेच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता वर्ल्ड कप फायनलसह भारत दौऱ्यातूनही आऊट झाला आहे. कॉनवेच्या जागी सध्या फॉर्मात असलेल्या डॅरेल मिचेलचा (Daryl Mitchell) न्यूझीलंडनं टीममध्ये प्रवेश केला आहे. मिचेल हा इंग्लंड विरुद्धच्या मॅचमधील न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो होता. त्यानं नाबाद 72 रनची खेळी केली होती.
मिचेलनं 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून आजवर 5 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी पाकिस्तान विरुद्ध क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं शतक झळकावलं आहे. मिचेल कोणत्याही क्रमांकावर बॅटींग करू शकतो, ही त्याची शक्ती असल्याचं मत न्यूझीलंड क्रिकेट टीमचे कोच गॅरी स्टेड यांनी व्यक्त केलं आहे.
#INDvNZ | @dazmitchell47 has replaced Devon Conway in the BLACKCAPS Test squad for the upcoming G.J. Gardner Homes Tour of India. https://t.co/BYaTc4eMrB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 13, 2021
पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये कमाल
पहिल्या टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाच्या शोधात असलेल्या मिचेलवर न्यूझीलंडनं यंदा नवी जबाबदारी सोपवली आहे. त्याला ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यानं 27 रन काढत चांगली सुरूवात केली. भारताविरुद्ध त्याचं अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं. त्यानंतर स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामिबिया विरुद्ध तो चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झाला होता.
T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीनं सोडलं मौन, झालेल्या चुकीबद्दल म्हणाला...
इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये एका बाजूनं विकेट पडत असतानाही मिचेलनं निर्धारानं खेळ केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. फॉर्मातील मिचेलचा टीममध्ये समावेश करण्यात आल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, T20 world cup