मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup, IND vs AFG: 'या' 5 कारणांमुळे मिळाला टीम इंडियाला स्पर्धेतील पहिला विजय

T20 World Cup, IND vs AFG: 'या' 5 कारणांमुळे मिळाला टीम इंडियाला स्पर्धेतील पहिला विजय

टीम इंडियानं अखेर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पहिला विजय मिळवला आहे. 5 मुख्य कारणांमुळे टीम इंडियाला विजय मिळाला.

टीम इंडियानं अखेर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पहिला विजय मिळवला आहे. 5 मुख्य कारणांमुळे टीम इंडियाला विजय मिळाला.

टीम इंडियानं अखेर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पहिला विजय मिळवला आहे. 5 मुख्य कारणांमुळे टीम इंडियाला विजय मिळाला.

मुंबई, 4 नोव्हेंबर: टीम इंडियानं अखेर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पहिला विजय मिळवला आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 66 रननं पराभव केला. भारतानं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 210 रनचा विशाल स्कोअर केला. त्याला उत्तर देताना अफगाणिस्तानची टीम 7 आऊट 144 रनच करु शकली. 5 मुख्य कारणांमुळे टीम इंडियाला विजय मिळाला.

पहिलं कारण: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी टीमला जोरदार सुरूवात करून दिली. त्यांनी 140 रनची पार्टनरशिप केली. पहिल्या दोन मॅचमध्ये टीमनं 6 ओव्हर्समध्येच दोन विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे मोठा स्कोअर होऊ शकला नाही. अफगाणिस्तान विरुद्ध दोघांनीही अर्धशतक झळकावलं.

दुसरं कारण: विराट कोहलीनं (Virat Kohli) या मॅचमध्ये चांगली रणनीती केली होती. टीमचा रनरेट सुधारणे आवश्यक होते. त्यामुळे तो 3 नंबरवर बॅटींगला आला नाही. त्यानं ऋषभ पंतला (Rishabh Pant) पाठवले. पंतनं हा निर्णय योग्य ठरवला. त्यानं 208 च्या स्ट्राईक रेटनं रन काढले.

तिसरं कारण: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खराब फॉर्ममध्ये होता. तरीही टीमनं त्याच्यावर विश्वास दाखवला. हार्दिकनंही टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवत 13 बॉलमध्ये 35 रन काढले. त्यामुळे टीमला 200 रनचा टप्पा ओलांडता आला.

चौथं कारण: भारतीय बॉलर्सनी 'पॉवर प्ले' मध्ये अफगाणिस्तानला अडचणीत आणत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला वेगवान सुरूवात करता आली नाही.

पाकिस्तानकडून Ball Tampering नंतर Video Tampering, विराटचा खोटा VIDEO केला Viral

पाचवं कारण: ऑफ स्पिनर आर. अश्विनला (R.Ashiwin) खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 14 रन देत 2 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजानं एक विकेट घेतली. तर फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं 3 विकेट्स घेत फॉर्मात परतण्याचे संकेत दिले आहेत.

First published:

Tags: Afghanistan, T20 world cup, Team india