मुंबई, 4 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) आत्तापर्यंत पाकिस्ताननं दमदार कामगिरी करत सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्तान टीमच्या या दमदार कामगिरीनंतरही त्यांच्या फॅन्सचे समाधान झालेलं नाही. पाकिस्तानचे खेळाडू हे बॉल टेम्परिंग (Ball Tampering) केल्याबद्दल क्रिकेट विश्वात बदनाम आहेत. आता त्यांच्या फॅन्सनी टीम इंडियाच्या विजयानंतर व्हिडीओ टेम्परिंग (Video Tampering) केले आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या बुधवारी झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नबीनला हा निर्णय घेण्यासाठी विराट कोहलीनं भाग पाडलं. विराटनं त्याला ऑर्डर दिली असा कांगावा पाकिस्तानच्या सोशल मीडियावरुन करण्यात येत आहे. त्याचे त्यांनी काही बनावट व्हिडीओ देखील व्हायरल केले आहेत.
Kholi to Nabi balling 1st 😂😂😂 they need some Privacy also #fixedmatch pic.twitter.com/rXC7XNDP4c
— N a ف e e s 💫 (@nafees_gis) November 3, 2021
पाकिस्तानकडून हे खोटे व्हिडीओ शेअर करत मॅच फिक्स असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. त्यांच्या फॅन्सचा भारत द्वेषच या व्हिडीओतून समोर आला आहे. भारताचा मोठा विजय टीम इंडियानं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन करता आल्या. या विजयामुळे भारताच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. T20 World Cup: टीम इंडियाला सेमी फायनलची अजूनही संधी, वाचा काय आहे समीकरण?

)







