मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup फायनलनंतर शोएब अख्तर नाराज, ICC वर केला गंभीर आरोप

T20 World Cup फायनलनंतर शोएब अख्तर नाराज, ICC वर केला गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव करत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर शोएब अख्तर आयसीसीवर नाराज झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. दुबईमध्ये रविवारी झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावलं. दोन्ही टीमनं यापूर्वी एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकला नव्हता. त्यामुळे टी20 क्रिकेटला नवा चॅम्पियन मिळणार हे फायनलपूर्वीच स्पष्ट झालं होतं. यामध्ये अखेर ऑस्ट्रेलियानं बाजी मारली आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंडचा 6 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव झाला आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये 289 रन काढणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कारानं गौरव करण्यात आला. वॉर्नरला हा पुरस्कार मिळताच त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) या निर्णयामुळे चांगलाच नाराज झाला. त्यानं सोशल मीडियावर याचा राग व्यक्त केला आहे.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) देण्यात यावा असं अख्तरचं मत होतं. पण आयसीसीनं वॉर्नरची निवड केली. हा कार्यक्रम संपताच अख्तरनं ट्वि्ट केलं. 'बाबर आझमला मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळालेलं पाहण्याची मला उत्सुकता होती. नक्कीच हा निर्णय अतिशय चूक आहे.' असं ट्विट बाबरनं केलं.

बाबर आझमनं या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 303 रन काढले. तर डेव्हिड वॉर्नर त्याच्यापेक्षा 14 रननं मागं राहिला. वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या तीन मॅचमध्ये वेस्ट इंडिज (नाबाद 89), पाकिस्तान (49) आणि न्यूझीलंड (53) रनची महत्त्वाची खेळी केली. यापैकी दोन इनिंग तर नॉक आऊट राऊंडमधील आहेत. वॉर्नरच्या या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकता आला आहे. दुसरिकडं बाबर आझम पाकिस्तानला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियानंच सेमी फायनलमध्ये पराभव केला. त्यामुळे हा पुरस्कार निवडणाऱ्या समितीनं बाबर आणि वॉर्नरमधील 14 रनच्या फरकाकडं दुर्लक्ष करत त्याला हा परस्कार दिला आहे.

T20 World Cup: वॉर्नरनं वर्ल्ड कप जिंकताच विल्यमसनच्या टीमला लगावला टोला

First published:

Tags: Australia, New zealand, T20 world cup