• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup: वॉर्नरनं वर्ल्ड कप जिंकताच विल्यमसनच्या टीमला लगावला टोला

T20 World Cup: वॉर्नरनं वर्ल्ड कप जिंकताच विल्यमसनच्या टीमला लगावला टोला

ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच ही स्पर्धा (T20 World Cup 2021) जिंकली असून या विजयात डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) मोलाचं योगदान आहे. वॉर्नरनं फायनल मॅचमध्ये 53 रनची महत्त्वाची खेळी केली.

  • Share this:
    मुंबई, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव करत (Australia vs New Zealand) टी20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली असून या विजयात डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) मोलाचं योगदान आहे. वॉर्नरनं फायनल मॅचमध्ये 53 रनची महत्त्वाची खेळी केली. त्यापूर्वी त्यानं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan) ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 49 रन काढले होते. टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय होता, कारण आयपीएलमध्ये (IPL 2021) वॉर्नर संघर्ष करत होता. एवढच नाही तर त्याला टीममधूनही बाहेर करण्यात आलं होतं. वॉर्नरच्या खराब फॉर्ममुळे त्याला सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) कॅप्टन्सीवरून डच्चू देण्यात आला. यानंतर केन विलियमसनला (Kane Williamson) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. वॉर्नरनं या स्पर्धेत 289 रन काढत 'मॅन ऑफ द सीरिज' चा पुरस्कार पटकावला. या वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या टीममधील निवडीवर प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना वॉर्नरनं चोख उत्तर दिलं आहे. वॉर्नरच्या या कामगिरीचा आयसीसीनं देखील गौरव केल्यानंतर वॉर्नर पती-पत्नींनी केन विल्यमसन कॅप्टन असलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या टीमला टोला लगावला आहे.वॉर्नरची पत्नी कँडीस वॉर्नरनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका ट्विटला  'आऊट ऑफ फॉर्म' असं कॅप्शन देत हैदराबादच्या टीमला टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट डेव्हिड वॉर्नरनं देखील रिट्विट केले आहे.
    डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून अखेरचा सामना 25 सप्टेंबर 2021 ला खेळला. यानंतर 27 सप्टेंबरला राजस्थानविरुद्धच्या सामन्यापासून त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं. यानंतर वॉर्नर हैदराबादच्या ड्रेसिंग रूममध्येही दिसला नाही. अखेरच्या काही सामन्यांमध्ये तर वॉर्नर स्टेडियममध्ये बसून हैदराबादच्या टीमची जर्सी घालून दिसला होता. आयपीएलच्या पुढच्या मोसमात आपण नव्या टीमसोबत आयपीएल खेळणार असल्याचं वॉर्नरने आधीच स्पष्ट केलं आहे. T20 World Cup: न्यूझीलंडनं 6 वर्षात तिसऱ्यांदा गमावली ICC ट्रॉफी, नशिबानं आणि ऑस्ट्रेलियानं केला पराभव
    Published by:News18 Desk
    First published: