मुंबई, 13 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तानच्या पराभवानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दुबईत झालेल्या सेमी फायनलमध्ये (Pakistan vs Australia) मॅचवर बराच काळ वर्चस्व गाजवल्यानंतरही पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियानं 5 विकेट्सनं पराभव केला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) या पराभवानंतर त्याच्या होणाऱ्या जावयावर नाराज झाला आहे. पाकिस्तान टीमचा प्रमुख फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हा त्याचा होणारा जावई आहे. मॅथ्यू वेडनं (Matthew Wade) गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये आफ्रिदीच्या ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स लगावत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर केलं. त्यानंतर ‘समा टीव्ही’ शी बोलताना शाहिद आफ्रिदीनं त्याच्या खेळावर नाराजी व्यक्त केली. ‘मी शाहिनच्या खेळावर खूश नाही. हसन अलीनं कॅच सोडला म्हणून तो सलग तीन सिक्स देऊ शकत नाही. शाहिनकडं चांगला स्पीड आहे. त्यानं समंजसपणे त्याचा योग्य वापर करायला हवा होता. तो स्पीडचा वापर करून ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकू शकला असता. इतके रन द्यावे असा तो बॉलर नाही. 21 वर्षांच्या शाहिन आफ्रिदीनं टी20 वर्ल्ड कपमधील 6 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या. त्यानं टीम इंडियाच्या विरुद्ध 31 रन देत 3 विकेट्स घेतल्या. ही त्याची टी20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी होती. शाहिननं त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीमध्ये 102 मॅचमध्ये 137 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं एक वेळा 4 विकेट्स तर 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचा इकोनॉमी रेट 7.78 आहे. T20 World Cup: संपूर्ण स्पर्धेची मेहनत 3 बॉलमध्ये वाया, एका मॅचमध्ये झाला हिरो ते व्हिलन प्रवास शाहिननं आजवर 19 टेस्टमध्ये 76 आणि 28 वन-डेमध्ये 53 विकेट्स घेतल्या आहेत. शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा (Aqsa) बरोबर त्याचं लग्न ठरलं आहे. पाकिस्ताननं टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग पाच मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होत. सुपर 12 मधील सर्व मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानला सेमी फायनलचा अडथळा पार करता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.