मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: संपूर्ण स्पर्धेची मेहनत 3 बॉलमध्ये वाया, एका मॅचमध्ये झाला हिरो ते व्हिलन प्रवास

T20 World Cup: संपूर्ण स्पर्धेची मेहनत 3 बॉलमध्ये वाया, एका मॅचमध्ये झाला हिरो ते व्हिलन प्रवास

टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव (Australia vs Pakistan) केला. आता ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंडशी लढत होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव (Australia vs Pakistan) केला. आता ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंडशी लढत होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव (Australia vs Pakistan) केला. आता ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंडशी लढत होणार आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव (Australia vs Pakistan) केला. आता ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंडशी (Australia vs Pakistan) लढत होणार आहे. पाकिस्ताननं या स्पर्धेत एकही मॅच न गमावता सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. सेमी फायनलमध्ये दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये अगदी 18 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तान मॅच जिंकेल अशी परिस्थिती होती.

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) 19 वी ओव्हर त्याचा बेस्ट बॉलर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi)  याला बॉलिंग दिली. त्यावेळी आफ्रिदी चांगली बॉलिंग करुन ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणेल अशी बाबरसह सर्व पाकिस्तानी फॅन्सची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलट घडलं.

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 22 रनची गरज होती. मॅथ्यू वेडनं (Mathhew Wade) शेवटची ओव्हर येऊच दिली नाही. त्यानं आफ्रिदीच्या शेवटच्या तीन बॉलवर तीन सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. संपूर्ण स्पर्धेत जोरदार बॉलिंग करणारा आफ्रिदी निर्णायक ओव्हरमध्ये निष्प्रभ ठरला. त्यानं फक्त 3 बॉलमध्ये पाकिस्तानचा हिरो ते व्हिलन असा प्रवास केला.

मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 30 बॉलमध्ये 49 रन केले. पाकिस्तानकडून शादाब खानला 4 आणि  आफ्रिदीला 1 विकेट मिळाली.

IND vs NZ : अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कॅप्टन, मुंबईच्या दमदार खेळाडूचं टेस्ट टीममध्ये पदार्पण

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी नवा चॅम्पियन मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: New zealand, Pakistan, T20 world cup