मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup, IND vs SCO: वादळी खेळीनंतर राहुलनं दिली आथिया शेट्टीवरील प्रेमाची कबुली

T20 World Cup, IND vs SCO: वादळी खेळीनंतर राहुलनं दिली आथिया शेट्टीवरील प्रेमाची कबुली

या वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सर्वात जलद अर्धशतक केएल राहुलनं (KL Rahul) झळकावलं. या वादळी खेळीनंतर राहुलनं आथिया शेट्टीवरील (Athiya Shetty) प्रेमाची कबुली दिली आहे.

या वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सर्वात जलद अर्धशतक केएल राहुलनं (KL Rahul) झळकावलं. या वादळी खेळीनंतर राहुलनं आथिया शेट्टीवरील (Athiya Shetty) प्रेमाची कबुली दिली आहे.

या वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सर्वात जलद अर्धशतक केएल राहुलनं (KL Rahul) झळकावलं. या वादळी खेळीनंतर राहुलनं आथिया शेट्टीवरील (Athiya Shetty) प्रेमाची कबुली दिली आहे.

दुबई, 6 नोव्हेंबर: पहिल्या दोन मॅचमधील पराभवानंतर टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) जोरदार पुनरागमन केलं आहे. भारतीय क्रिकेट टीमला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी शुक्रवारच्या मॅचमध्ये स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) मोठा विजय हवा होता. टीम इंडियानं पहिल्यांदा बॉलिंग करत स्कॉटलंडला 85 रनवर ऑल आऊट केलं. त्यानंतर 86 बॉलचं लक्ष्य त्यांनी फक्त 39 बॉलमध्ये पूर्ण करत मोठा विजय मिळवला.

टीम इंडियाच्या या विजयात केएल राहुलचं (KL Rahul) मोठं योगदान होतं. त्यानं फक्त 18 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक केलं. या वर्ल्ड कपमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम राहुलनं केला. राहुलचा स्ट्राईक रेट 263.16 इतका होता. राहुलच्या या खेळीला सर्व फॅन्सनी जोरदार दाद दिली. तसंच त्याची कथित गर्लफ्रेंड आथिया शेट्टी (Athiya Shetty) देखील चांगलीच खूश झाली होती. दुबईतील स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या आथियानं जोरदार टाळ्या वाजवत राहुलच्या अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं.

आथिया शेट्टीचा शुक्रवारी 29 वा वाढदिवस होता. राहुलची ही खेळी म्हणजे तिच्यासाठी बर्थ-डे गिफ्ट ठरली. राहुलनं या खेळीनंतर आथिया शेट्टीसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. तसंच त्यावर 'हॅप्पी बर्थ डे माय लव्ह' असं कॅप्शन दिलं. राहुलनं पहिल्यांदाच जाहीरपणे आथियावरील प्रेमाची कबुली दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

स्कॉटलंडविरुद्धच्या या विजयामुळे टीम इंडियाचा नेट रनरेटही ग्रुपमधला सर्वोत्तम झाला आहे. ग्रुपमधला सर्वोत्तम रनरेट करण्यासाठी स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाला 7.1 ओव्हरमध्ये पार करणं गरजेचं होतं, पण भारताने हे आव्हान 4 बॉल आधीच म्हणजे 6.3 ओव्हरमध्ये पार केलं. यामुळे भारताचा नेट रनरेट आता +1.619 एवढा झाला आहे. 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह भारताच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न झालं आणखी सोपं, करावं लागणार हे काम

First published:

Tags: Instagram post, Kl rahul, T20 world cup, Team india