मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Pakistan: बाबर आझम नाही तर 'या' खेळाडूचा आहे टीम इंडियाला धोका

India vs Pakistan: बाबर आझम नाही तर 'या' खेळाडूचा आहे टीम इंडियाला धोका

India vs Pakistan T20 World Cup: भारताविरुद्धच्या मॅचमध्ये बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतील असं अनेकांचं मत आहे. पण, या दोघांशिवाय आणखी एका धोकादायक बॅटरपासून टीम इंडियाला सावध राहावं लागेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाची पहिली लढत आज (रविवारी) होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये भारतीय टीमची पहिली लढत पाकिस्तानशी (IND vs PAK T20 World Cup) आहे. या मॅचसाठी दोन्ही टीमनं जय्यत तयारी केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहास आणि सध्याचा फॉर्म या दोन्ही गोष्टी टीम इंडियाच्या बाजूनं आहेत. तरीही भारतीय टीम पाकिस्तानला हलकं लेखण्याची चूक करणार नाही. विशेषत: पाकिस्तान टीममधील एक खेळाडू या मॅचमध्ये गेमचेंजर ठरु शकतो. त्यामुळे त्याला लवकरात लवकर आऊट करणे हे टीम इंडियाचे प्रमुख लक्ष्य असेल.

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतील असं अनेकांचं मत आहे. पण, या दोघांशिवाय आणखी एका धोकादायक बॅटरपासून टीम इंडियाला सावध राहावं लागेल. त्याची बॅट चालली तर टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. तो बॅटर आहे फखर जमान  (Fakhar Zaman) चार वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा तोच शिल्पकार होता.

India vs Pakistan : विराट टॉस जिंकल्यानंतर काय घेणार निर्णय? वाचा दुबईचा Pitch Report

 फखरनं फायनलमध्ये 106 बॉलमध्ये 114 रन काढले होते. या खेळीत 12 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. त्याच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं 50 ओव्हर्समध्ये 4 आऊट 338 रनचा विशाल स्कोअर केला होता. त्यानंतर भारतीय टीम 30.3 ओव्हर्समध्ये 158 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्ताननं ती मॅच 180 रननं जिंकली होती.

India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर आफ्रिदीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

वॉर्म-अप मॅचमध्येही चांगला खेळ

फखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध झालेल्या वॉर्म-अप मॅचमध्ये चांगली बॅटींग करत 52 बॉलमध्ये 98 रन केले होते. या दरम्यान तो एकदाही आऊट झाला नाही.

India vs Pakistan Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला कधी आणि कुठे पाहता येणार?

 पीएसएलमध्येही बाबरनं 10 मॅचमध्ये 287 रन काढले होते. त्यानं 53 टी20 मध्ये 136 च्या स्ट्राईक रेटनं 1021 रन काढले आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे टीम इंडियाला फखरला लवकारत लवकर आऊट करण्याचा उपाय शोधणे आवश्यक आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup