मुंबई, 3 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील आव्हान (T20 World Cup 2021) कायम राखण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्धची मॅच (India vs Afghanistan) मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. ही मॅच जिंकून रनरेट देखील चांगला करण्याचं आव्हान भारतीय टीमसमोर आहे. तर अफगाणिस्तानला सेमी फायनलची दावेदारी मजबूत करण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.
ग्रुप 2 मध्ये अफगाणिस्तानची टीम सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 4 पॉईंट्स आहेत. त्यांनी आत्तापर्यंत स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानकडून निसटता पराभव स्विकारला आहे. अफगाणिस्तानची शेवटची मॅच टीम इंडियाला पराभूत करुन फॉर्मात आलेल्या न्यूझीलंडशी होणार आहे. तर टीम इंडियाच्या अफगाणिस्तानसह स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्धच्या मॅच बाकी आहेत.
किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सामना 3 नोव्हेंबर रोजी बुधवारी आबूधाबीमधील शेख जायद स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.
कुठे होणार लाईव्ह प्रसारण?
या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.
जिओवरही पाहता येणार मॅच
रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना या महामुकाबल्याची मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक भारत-पाकिस्तान मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील.
IND vs AFG: सावधान टीम इंडिया! UAE मध्ये पाकिस्तानपेक्षा भारी आहे अफगाणिस्तानचा रेकॉर्ड
भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
अफगाणिस्तानची टीम: मोहम्मद नबी (कॅप्टन), अहमद शहजाद, हरजतउल्लाह जजाई, रहमानुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, करीम जनत, फरीद अहमद, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, उस्मान घानी आणि हसमतउल्लाह शाहिदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, T20 world cup, Team india