मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs AFG: सावधान टीम इंडिया! UAE मध्ये पाकिस्तानपेक्षा भारी आहे अफगाणिस्तानचा रेकॉर्ड

T20 World Cup, IND vs AFG: सावधान टीम इंडिया! UAE मध्ये पाकिस्तानपेक्षा भारी आहे अफगाणिस्तानचा रेकॉर्ड

टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात होती. आता स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीमला अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) मोठा पराभव करणे आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात होती. पण आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडनं केलेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. आता बुधवारी होणाऱ्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा मोठा पराभव (India vs Afghanistan)  करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे टीमला नेट रन रेट देखील चांगला करावा लागणार आहे.

अफगाणिस्तानचा पराभव करणे हे तितकं सोपं नाही. कारण यूएईला दुसरं घर समजणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमपेक्षा (Pakistan Cricket Team) अफगाणिस्तानचा येथील रेकॉर्ड चांगला आहे. अफगाणिस्ताननं आजवर यूएईमध्ये 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यापैकी 28 जिंकले असून फक्त 8 गमावले आहेत.

T20 वर्ल्ड कपमध्ये कोण सरस?

अफगाणिस्तानची टीम या वर्ल्ड कपमध्ये चांगलीच फॉर्मात आहे. त्यांनी स्कॉटलंड आणि नामिबियावर दणदणीत विजय मिळवला असून पाकिस्तान विरुद्ध निसटता पराभव स्वीकारला आहे. मात्र टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहास टीम इंडियाच्या बाजूनं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच झाल्या असून या दोन्ही मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. 2010 साली 7 विकेट्सनं तर 2012 मध्ये 23 रननं टीम इंडियानं अफगाणिस्तानचा पराभव केला होता.

2012 साली झालेल्या मॅचमधील 3 खेळाडू यंदाची मॅच देखील खेळणार आहेत. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा तर अफगाणिस्तानकडून त्यांचा कॅप्टन मोहम्मद नबी 2012 साली झालेल्या टी20 मॅचमध्ये खेळले होते. या मॅचसाठीही टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार अशी चर्चा आहे.

अफगाणिस्तानच्या टीममध्ये मोठा बदल, माजी कॅप्टनच्या जागी ऑल राऊंडरचा समावेश

मॅचच्या आदल्या दिवशी मंगळवारी झालेल्या प्रॅक्टीसच्या दिवशी टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात मोठी चर्चा झालेली दिसली. सूर्या पाठदुखीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी खेळवण्यात आलेला इशान किशन (Ishan Kishan) अपयशी ठरला होता. इशान फक्त 4 रन काढून आऊट झाला. सूर्यानं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध 11 रन काढले होते.

First published:

Tags: Afghanistan, T20 world cup, Team india