मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाला मोठ्या फरकानं कसं हरवलं? विल्यमसननं सांगितलं रहस्य

T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाला मोठ्या फरकानं कसं हरवलं? विल्यमसननं सांगितलं रहस्य

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या महत्त्वाच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं या मोठ्या विजयाचं रहस्य सांगितलं.

दुबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या महत्त्वाच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. दुबईत सुपर 12 मध्ये झालेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियानं 7 आऊट 110 रन काढले. 111 रनचं आव्हान न्यूझीलंडनं 14.3 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं या मोठ्या विजयाचं रहस्य सांगितलं.

विल्यमसन मॅचनंतर बोलताना म्हणाला की, 'टीम इंडियाविरुद्ध ऑल राऊंड कामगिरीमुळे आम्हाला हा विजय मिळला. आम्ही संपूर्ण मॅच त्यांना दबावात ठेवलं. आमच्या ओपनिंग बॅटर्सनी चांगली कामगिरी केली. आमच्याकडं दोन चांगले स्पिनर्स आहेत. त्यांनी एकत्रित चांगली बॉलिंग केली. ईश सोधी मर्यादीत ओव्हर्स क्रिकेटमधील चांगला बॉलर आहे. येथील वातावरणात त्याची बॉलिंग उपयुक्त ठरत आहे.

आम्ही आमच्या 'ब्रँड ऑफ क्रिकेट'साठी कटिबद्ध आहोत. त्याचं उदाहरण आमच्या खेळाडूंनी सादर केलं आहे. ईश सोधी वेगवेगळ्या लीगमघ्ये खेळला आहे. आम्ही आता उर्वरित मॅचचा विचार करत आहोत.' असं विल्यमसननं स्पष्ट केलंय.

भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ट्रेंट बोल्ट आणि ईश सोधीनं दमदार कामगिरी करत 7 पैकी 5 विकेट्स घेतल्या. बोल्टनं 20 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर सोधीनं त्याच्या वाढदिवशी भारतीय बॅटर्सना जखडून ठेवत 17 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी सोधीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.

T20 World Cup, IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीनं मान्य केली मोठी चूक

भारताचे भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती

भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये बड्या टीमना धक्का देण्याची क्षमता आहे.  भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

First published:

Tags: New zealand, T20 world cup, Team india